शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चतु:श्रृंगी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी ७ कोटींचा प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 16:02 IST

चतु:श्रृंगी मंदिर हे सुमारे २०० वर्षे जुने स्वयंभु देवस्थान आहे़...

ठळक मुद्देगेल्या काही वर्षांंपासून मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी मंदिर ट्रस्टचे प्रयत्न सुरु

पुणे : चतु:श्रृंगी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी मंदिर समितीने ७ कोटी रुपयांचा प्रकल्पाची आखणी केली असून त्याचे काम दिवाळीनंतर सुरु करण्यात येणार आहे़. यामध्ये प्रामुख्याने मंदिर परिसरातील सुशोभिकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकता जिना (एक्सस्लेटर), ध्यान मंदिर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सभामंडपाचे विस्तारीकरण याचा समावेश आहे, असे चतु:श्रृंगी मंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त दिलीप अनगळ यांनी सांगितले़. 

चतु:श्रृंगी मंदिर हे सुमारे २०० वर्षे जुने स्वयंभु देवस्थान आहे़. नवरात्रीनिमित्त येथे यात्रा भरत असून देवीच्या दर्शनासाठी नवरात्रीच्या काळात सुमारे अडीच लाख भाविक येत असतात़. गेल्या काही वर्षांंपासून मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी मंदिर ट्रस्टचे प्रयत्न सुरु आहेत़. या संपूर्ण परिसराचे लँडस्केप डिझाईन वर्षा व रवी गवंडी यांनी केले असून ऑकिटेक्ट नरेंद्र डेंगळे यांनी प्रकल्पाची आखणी केली आहे़. यापूर्वी येथे रोपवे उभारण्याचा प्रस्ताव होता़. पण, त्यादृष्टीने उंची कमी असल्याने त्याऐवजी एक्सस्लेटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़. याशिवाय मंदिराच्या सभामंडपाचे विस्तारीकरण करुन तो पुढच्या बाजूने थोडा उंच करण्यात येणार आहे़. त्यामुळे तेथून भाविकांना थेट देवीचे दर्शन होऊ शकेल़. चतु:श्रृंगी मंदिरात नवरात्र उत्सव २९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान होणार असून २० सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता घटस्थापना करण्यात येणार आहे़. मंदिरात दररोज सकाळी १० व रात्री ९ वाजता महाआरती होणार आहे़. गणपती मंदिरात रोज दुपारी भजने होणार आहेत़. सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता नवचंडी होम होणार आहे़. यंदा नवरात्री उत्सवात स्तनपात कक्षाची व्यवस्था ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे़. पूजा व प्रसाद साहित्याचे पाच स्टॉल असणार आहेत़. पोलीस, होमगार्ड, खासगी रक्षक, तसेच मंदिरात बंदुकधारी सुरक्षा रक्षक असणार आहे़. व्यवस्थापन सहाय्यासाठी अनिरुद्ध सेवा केंद्राचे १५० स्वयंसेवक असून २० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत़. नवरात्रीत रांगेत उभे राहणाऱ्या भक्तांसाठी पिण्याचे पाणी देण्याची व्यवस्था असून भाविकांना दर्शन घेऊन लवकर बाहेर पडता यावे, यासाठी बॅरिकेटची व्यवस्था आहे़. या काळात २४ तास रुग्णवाहिका राहणार असून ६ डॉक्टर प्रत्येकवेळी उपस्थित असणार आहेत़. याठिकाणी औषधोपचार मोफत दिले जाणार आहेत़.  चतु:शृंगी मंदिर ट्रस्टतर्फे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी ३ लाख रुपयांची देणगी मुख्यमंत्री रिलिफ फंडाला देण्यात आली असल्याचे अनगळ यांनी सांगितले़. 

 

टॅग्स :Puneपुणेchatushrungi templeचतु:श्रृंगी मंदीरGovernmentसरकार