शिरूर ग्रामीणमध्ये आढळले ६८ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:11 IST2021-03-28T04:11:05+5:302021-03-28T04:11:05+5:30
तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली दिलेल्या माहितीनुसार: शिक्रापूर येथे ३१, सणसवाडी ...

शिरूर ग्रामीणमध्ये आढळले ६८ कोरोनाबाधित
तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली दिलेल्या माहितीनुसार: शिक्रापूर येथे ३१, सणसवाडी येथे १२, तळेगाव ढमढेरे येथे ११, निमगाव म्हाळुंगी येथे २, कोंढापुरी येथे ४, कोरेगाव भीमा येथे २, पारोडी येथे ४, विठ्ठलवाडी, डिंग्रजवाडी येथे प्रत्येकी एक असे तब्बल ६८ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर शिक्रापूर येथे दररोज सरासरी १० ते १५ रुग्ण नव्याने कोरोना बाधित होत असताना शनिवारी पुन्हा एकाच दिवसात ही संख्या ३१वर पोहोचली. त्यामुळे भीतीचे वातावरणही निर्माण झाले आहे. परिसरातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन गर्दी टाळण्याचे व मास्क वापरण्याचे आवाहन डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी केले आहे. शिक्रापूर बरोबरच पाबळ येथे मागील आठ दिवसात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.