शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डेक्कन कॉलेजसाठी पालिकेकडून ६७ लाखांचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 20:54 IST

डेक्कन कॉलेजची वास्तू ही ग्रेड-१ दर्जाची असून १८६४ साली बांधण्यात आलेली आहे...

ठळक मुद्देस्थायीची मान्यता : हेरीटेज वास्तूचे जतन व संवर्धन करणे

पुणे : डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्थेच्या हेरीटेज वास्तूचे जतन व संवर्धन करण्यासाठी महापालिकेकडून ६७ लाख रुपयांचा निधी दिला जाणार असून भवन विभागाच्या प्रस्तावाला स्थायी समितीच्या शुक्रवारी मान्यता देण्यात आली. डेक्कन कॉलेजची वास्तू ही ग्रेड-१ दर्जाची असून १८६४ साली बांधण्यात आलेली आहे. ही वास्तू स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असून याठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, इतिहास तज्ञ व्हि. के. राजवाडे, गोपाळ गणेश आगरकर, भांडारकर संस्थेचे संस्थाचे आर. जी. भांडारकर, गुरुदेव रानडे यासारख्या नामवंत व्यक्तींनी शिक्षण घेतलेले आहे. ही वास्तू पुरातत्व शास्त्र व भाषा शास्त्र यामध्ये शिक्षण देणारी भारतातील एकमेव संस्था आहे. या ठिकाणी पीएचडी, एमएचे अध्यापन करण्यासाठी देश-विदेशामधून विद्यार्थी व संशोधक येत असतात. या वास्तूचे जतन व संवर्धन करण्यासाठी पालिकेकडून हा निधी देण्यात येणार आहे. या निधीमधून सागवानी लाकूड कामातील कलाकुसरीचे काम केले जाणार आहे. तसेच चुन्यातील प्लास्टर करणे, लाकडावरील रंग घासून काढणे, लीड शीट पुरविणे आणि बसविणे, दगडी बांधकामाला वॅकर केमिकल लावणे, जीआय पत्रे पुरविणे आणि बसविणे, लाकूड कामास शेलॅक पॉलिश करणे, दगडी बांधकामाला चुन्याचे पॉईंटींग करणे, अस्तित्वातील दगडी पेव्हिंगला अ‍ॅशलर फिनिश देणे, बसाल्ट स्टोन पेव्हिंग करणे, अ‍ॅशलर स्टोन कोपींग पुरविणे व लावणे अशी कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी भवन विभागाने ७४ लाख ९९ हजारांचे पूर्वगणक पत्रक तयार करण्यात आले होते. यापैकी ६६ लाख ९६ हजार ३६३ रुपयांच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्याला स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. 

टॅग्स :PuneपुणेDeccan Collegeडेक्कन कॉलेजPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका