रोहिदासमहाराजांची ६४० वी जयंती उत्साहात
By Admin | Updated: February 13, 2017 01:21 IST2017-02-13T01:21:11+5:302017-02-13T01:21:11+5:30
तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ व समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी रोहिदासमहाराज

रोहिदासमहाराजांची ६४० वी जयंती उत्साहात
शेलपिंपळगाव : तीर्थक्षेत्र आळंदी देवाची येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघ व समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने संत शिरोमणी रोहिदासमहाराज यांची ६४० वी जयंती विविध उपक्रमांतून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटे माऊलींची महापूजा, गुरू गोविंदबाबा महापूजा, संत रोहिदासमहाराज प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन व मृदंगपूजन अशा विविध धार्मिक उपक्रमांनंतर अलंकापुरीत प्रथमच भव्य पखवाज (मृदंग) वादन स्पर्धेेचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे जिल्ह्यातूनच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे साडेतीनशे मृदंगवादकांनी यात सहभाग घेतला होता. संपूर्ण दिवसभर विविध ताल, लय, सूर व रामकृष्णहरी भजनाचे बोल, सरपटी व जलद धुमाळी मात्रा, ठाय धुमाळी मात्रा, स्पेशल सोलो वादन व स्वतंत्र मात्रा अशा निरनिराळ्या तालांनी मृदंगवादनाचा अखंड गजर कानी पडत होता.
स्पर्धेेनंतर विजेत्यांना ट्रॉफी, दोन पखवाज, रोख रक्कम, तसेच सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्रके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष श्रीरंग आबनावे, नगरसेवक डी. डी. भोसले, माजी नगराध्यक्ष वासुदेव घुंडरे, अतुल लोणकर, शंकर येळवंडे, नगरसेवक पांडुरंग वहिले, सुरेश गाडेकर, विश्वनाथ नेटके, अरुण बडगुजर, महादेव पाखरे, तुकाराम नेटके, संदीपानमहाराज घायाळ, चंद्रकांत कानडे, नारायण गाडेकर, महेश केदारी, मारुती पाचारणे, शिवाजी गवळी, चेतन कानडे, तुषार नेटके, पंकज पाखरे, लक्ष्मण नेटके आदींसह भाविक-नागरिक व वारकरी संप्रदायातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. स्पर्धेत परीक्षक म्हणून पंडित दास्तोपंत यांनी काम
पाहिले.(वार्ताहर)