ओतूर ग्रामपंचायत निवडणुकीच्या १७ जागांसाठी ६३ उमेदवार रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:29 IST2021-01-08T04:29:34+5:302021-01-08T04:29:34+5:30

गेले १५ दिवसांत निवडणुकीचा धुराळा उडाला .२३ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल केले जात होते दि .३० डिसेंबर या ...

63 candidates in fray for 17 seats in Ootur Gram Panchayat | ओतूर ग्रामपंचायत निवडणुकीच्या १७ जागांसाठी ६३ उमेदवार रिंगणात

ओतूर ग्रामपंचायत निवडणुकीच्या १७ जागांसाठी ६३ उमेदवार रिंगणात

गेले १५ दिवसांत निवडणुकीचा धुराळा उडाला .२३ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल केले जात होते दि .३० डिसेंबर या अखेरच्या दिवशी विवध पक्ष आघाडी अपक्ष असे तब्बल ९९ अर्ज दाखल करण्यात आले होते ३१ डिसेंबर ला ३ अर्ज छाननीत बाद झाले व ९६ उमेदवार रिंगणात राहिले .होते ४ जानेवारी हा दिवस माघारी व चिन्हे वाटपाचा दिवस होता.. या ९६ उमेदवारापैकी १९ ,जणांनी माघार घेतल्याने निवडणूक रिंगणात ६३ उमेदवार रिंगणात आहेत

या निवडणुकीत शिवसेना ,राष्ट्रवादी ओतूर विकास आघाडी अपक्ष अशा लढती रंगणार आहेत.

शिवसेनेचे शिवसेना पुरस्कृत श्री कपर्दिकेश्वर पँनेल ,राष्ट्रवादी काँग्रेस चे राष्ट्रवादी पँनेल तिसरे ओतूर विकास आघाडी अशा तिरंगी लढती होत आहेत.

ओतूर वार्ड क्र.४ मध्ये अपक्ष पक्षाचे एक पँनेल आहे फक्त त्याच वार्डात चौरंगी लढत होणार आहे.

वार्ड क्र.१ (तीन जागा ) ११ उमेदवार.

वार्ड क्र.२ ( ३जागा ) १० उमेदवार .

वार्ड क्र३ (२ जागा ) ६ उमेदवार .

वार्ड क्र.४ ( ३ जागा ) १७ उमेदवार

वार्ड क्र.५ ( ३ जागा ) ,१० उमेदवार .

वार्ड क्र६ (३ जागा ) ९ उमेदवार

असे अर्ज माघारी नंतर चे चित्र आहे. सोशल मिडिया द्वारे प्रचार सुरु झाला आहे.

Web Title: 63 candidates in fray for 17 seats in Ootur Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.