शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील खडकवासला धरणातून 6 हजार क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 13:36 IST

पुण्यात धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने शुक्रवारी ( 22  सप्टेंबर ) सकाळपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत 6 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे.

पुणे, दि. 22- धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढल्याने शुक्रवारी ( 22  सप्टेंबर ) सकाळपासून खडकवासला धरणातून मुठा नदीत 6 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे. शुक्रवारी सकाळी पुणे वेधशाळेत 12.5 मि.मी पाऊसाची नोंद झाली होती. पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी खडकवासला, पानशेत, वरसगाव ही धरणे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे बुधवारी पावसाचा जोर वाढल्यावर खडकवासला धरणातून या हंगामातील सर्वाधिक 23 हजार क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात आले होते. त्यामुळे पुणे शहरात पूर आला होता. त्यानंतर पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. पानशेत, वरसगाव धरणातून विसर्ग सुरू असल्याने खडकवासला धरणात येणाऱ्या पाण्यात वाढ होत आहे, त्यामुळे खडकवासला धरणातून नदीत पाणी सोडण्यात वाढ करण्यात आली आहे.

जायकवाडीच्या 18 दरवाजांतून सोडले पाणी

जायकवाडी धरणात येणारी पाण्याची आवक अचानक वाढल्याने गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास तातडीने धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. धरणात जवळपास १ लाख क्युसेक्सने आवक दाखल होत होती. या परिस्थितीत जायकवाडी धरणाची पाणीपातळी लक्षात घेता गुरुवारी रात्री ११.३० वाजता धरणाचे १८ वक्र दरवाजे अर्धा फूट वर उचलण्यात आले असून, धरणातून दहा हजार क्युसेस पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आले. दरवाजा क्र. १० ते २७ या दरवाजांतून पाणी सोडण्यात आले. यावेळी जायकवाडीचे कार्यकारी अभियंता सी. आर. बनसोडे, तहसीलदार महेश सावंत, जायकवाडी धरण उपअभियंता अशोक चव्हाण, पोलीस निरीक्षक अशोक गिरी,  नगर परिषद मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी, आर. ई. चक्रे, माजी नगराध्यक्ष दत्ता पा. गोर्डे,  नामदेव खरात, पवन लोहिया, शाम लोहिया, भिकाजी आठवले आदी उपस्थित होते. जायकवाडी धरणातून यापूर्वी २००८ मध्ये सकाळी ११ वाजता १ लाख क्युसेक्सने पाणी सोडले होते. हे पाणी गोदावरी नदीपात्राबाहेर न गेल्याने कुठलीही हानी झाली नव्हती. परंतु २००६ मध्ये अडीच लाख क्युसेक्सने पाणी सोडले, तेव्हा ७० टक्के पैठण शहर पाण्याखाली गेले होते. शिवाय १५ गावांतही पाणी घुसले होते. 

टॅग्स :Damधरण