शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात होणार ६० हजार कोटींचा पतपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 19:36 IST

बँक ऑफ महाराष्ट्रच्या जिल्हा अग्रणी बँक व जिल्ह्यातील सर्व बँकांच्या पुढाकाराने पत पुरवठा आराखडा तयार केला आहे.

ठळक मुद्देजिल्हा पत आराखडा जाहीर : पीक कर्जासाठी मिळणार साडेसहा हजार कोटीपत आराखडा हा ६०,६३० कोटी रुपयांचा असून गेल्या वर्षीपेक्षा त्यात ८ टक्क्यांनी वाढ

पुणे : जिल्ह्याचा २०१९-२० या वर्षासाठीचा ६०,६३० कोटी रुपयांचा पत आराखडा जाहीर झाला आहे. त्यातील साडेसहा हजार कोटी रुपयांची तरतूद पीक कर्जावर केली आहे. याशिवाय सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योग, पायाभूत सुविधा यासाठी उर्वरीत निधीची तरतूद केली आहे.   बँक ऑफ महाराष्ट्रच्या जिल्हा अग्रणी बँक व जिल्ह्यातील सर्व बँकांच्या पुढाकाराने पत पुरवठा आराखडा तयार केला आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रभाकर गावडे यांच्या हस्ते आराखडा सादर केला. बँक ऑफ महाराष्ट्र परीमंडल पूर्व क्षेत्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक सुधीर कुलकर्णी, भारतीय रिझर्व बँकेचे एल. डी.ओ. बी.एम. कोरी, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी नितीन शेळके, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आनंद बेडेकर उपस्थित होते.पत आराखडा हा ६०,६३० कोटी रुपयांचा असून गेल्या वर्षीपेक्षा त्यात ८ टक्क्यांनी वाढ केली आहे. पायाभूत क्षेत्रासाठी ३७,४६८ कोटी रुपयांची तरतूद केली असून, ती एकून पतपुरवठ्याच्या ६२ टक्के आहे. कृषी कर्जासाठी ६ हजार ५५१ कोटी रुपयांची तरतूद केली असून त्याचे प्रमाण प्राथमिकता कर्जापैकी १७ टक्के आहे. कृषी कर्जामध्ये प्रामुख्याने सेंद्रीय शेती, फुले व फळबाग लागवड, हरितगृह, कृषी निर्यात योजना, कृषी यांत्रीकीकरण, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान तसेच शेतीपुरक व दुय्यम योजनांचा समावेश आहे.पतपुरवठा आराखड्यात सुक्ष्म,लघु व मध्यम (एम.एस.एम.इ.) उद्योगांसाठी तब्बल २२ हजार ९०८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. स्वयंरोजगार योजना, शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज आणि छोट्या व्यवसायासाठी ८ हजार ९ कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवला आहे. या पतपुरवठा आराखड्यामध्ये व्यापारी बँका, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच महाराष्ट्र ग्रामीण बँकेसह ४१ बँकांच्या १ हजार ७९४ शाखांचा सहभाग आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांनी दिनांक मार्च २०१९ अखेरीस प्राथमिकता क्षेत्रात ३५ हजार १०८  कोटींचे वाटप केले आहे. गेल्या आर्थिक वर्षांत बँकाना दिलेले उद्दीष्ट, त्यांनी पूर्ण केले असल्याची माहिती या वेळी दिली. -

टॅग्स :Puneपुणेagricultureशेतीbankबँकbusinessव्यवसाय