श्रीलक्ष्मी ज्वेलर्सच्या ‘पद्‌मलक्ष्मी’ प्रदर्शनामध्ये घडणावळीत ६०% सवलत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:16 IST2021-03-04T04:16:16+5:302021-03-04T04:16:16+5:30

पुणे -पुण्याच्या दक्षिण भागात असलेली लोकप्रिय सुवर्णपेढी श्री लक्ष्मी ज्वेलर्स यंदा ३५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्याचबरोबर ...

60% discount in Srilakshmi Jewelers' 'Padmalakshmi' exhibition! | श्रीलक्ष्मी ज्वेलर्सच्या ‘पद्‌मलक्ष्मी’ प्रदर्शनामध्ये घडणावळीत ६०% सवलत !

श्रीलक्ष्मी ज्वेलर्सच्या ‘पद्‌मलक्ष्मी’ प्रदर्शनामध्ये घडणावळीत ६०% सवलत !

पुणे -पुण्याच्या दक्षिण भागात असलेली लोकप्रिय सुवर्णपेढी श्री लक्ष्मी ज्वेलर्स यंदा ३५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्याचबरोबर त्यांच्या नव्या प्रशस्त शोरूमचाही ३ रा वर्धापन सोहळा आहे. यानिमित्ताने श्री लक्ष्मी ज्वेलर्सद्वारे दि. ७ ते २१ मार्च या कालावधीत ‘पद्‌मलक्ष्मी’ हे एक्सक्लुझिव्ह अलंकारांचे प्रदर्शन आयोजिले आहे. या प्रदर्शनाचे खास वैशिष्ट्‌य म्हणजे मोहक व नावीन्यपूर्ण दागिन्यांची शृंखला. त्याचबरोबर घडणावळीमध्ये मिळणारी ६० % सवलत ही देखील तितकीच आकर्षक आहे.

लग्न सराईसाठी अतिशय आकर्षक आणि सुबक कलाकुसरीची मंगळसूत्र ( गंठण) आणि दागिन्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.

गोकाक आणि टेम्पल ज्वेलरीचे निर्माते असल्यामुळे भरपूर व्हरायटी आणि करणावळ मात्र कमी ही श्री लक्ष्मी ज्वेलर्सची खासियत आहे. तसेच कोणत्याही ९१६ च्या दागिन्यांवर तूट किंवा घट नाही. कॅरेटो मीटर वर सोन्याची शुद्धता आपण स्वतः तपासून पाहू शकता.

वर्धापनाच्या ह्या आनंदात सहभागी होताना जास्तीत जास्त दागिने खरेदीचा आनंद घेण्यासाठी श्री लक्ष्मी ज्वेलर्सला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन संचालक किसन वर्मा ह्यांनी केले आहे.

कोविडचे संकट लक्षात घेऊन ग्राहकांच्या सुरक्षिततेची सर्व प्रकारची काळजी श्री लक्ष्मी ज्वेलर्स तर्फे घेतली जात आहे.

Web Title: 60% discount in Srilakshmi Jewelers' 'Padmalakshmi' exhibition!