शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरात ६० सीएनजी पंपांवर, २ लाख वाहनांचा भार; म्हणून लागते वाहनांची रांग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 13:00 IST

शहरातील सीएनजी पंपावरील गर्दी पाहून अनेक जण शहराबाहेर जाऊन सीएनजी भरून घेत आहेत

प्रसाद कानडे

पुणे: प्रदूषणाला आळा बसावा म्हणून सीएनजी व ई-वाहनांचा (CNG and e-vehicle uses) वापर वाढला पाहिजे. मात्र त्याला पूरक असणारी यंत्रणाच अत्यंत तोकडी आहे. पुण्यात जवळपास २ लाख सीएनजीवर धावणारी वाहने आहेत. मात्र त्यासाठी अवघे साठ पंप आहेत. साठ पंपावर भार येत असल्याने रोज हजारो पुणेकरांना वाहनांत इंधन भरण्यासाठी ३० ते ४० मिनिटे रांगेत थांबावे लागत आहे. शहरातील सीएनजी पंपावरील गर्दी पाहून अनेक जण शहराबाहेर जाऊन सीएनजी भरून घेत आहेत. वाहनांची संख्या लक्षात घेता पुण्याला आणखी किमान दोनशे पंपाची गरज आहे.

पेट्रोल व डिझेल च्या तुलनेत सीएनजीचे दर कमी आहेत. त्यामुळे अनेक वाहनधारक आपले वाहन सीएनजीवर रूपांतरित करीत आहे. मात्र त्यांना आता पश्चतापाची वेळ आली आहे. कारण त्यांना सीएनजी भरून घेण्यासाठी किमान ४० ते ५० मिनिटे खर्ची घालावे लागत आहे. यात चारचाकीसह रिक्षा चालकांची संख्या जास्त आहे. शिवाय वाहनधारकांना लवकरात लवकर सीएनजी मिळावे म्हणून कर्मचारीदेखील तणावात व गडबडीने काम करतात. टाकीत सीएनजी भरताना त्याचे प्रेशर हे ४५० पौंड इतके असते. यावेळी काही अपघात घडला तर जीवितहानी होण्याची दाट शक्यता असते. तेव्हा पुण्यात वाहनांची संख्या लक्षात घेता सीएनजी पंप वाढविण्याची गरज आहे.

रोज ७ लाख किलो सीएनजीची विक्री :

पुण्यात साठ पंपावरून रोज सात ते साडेसात लाख किलो सीएनजीची विक्री होते. पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली की विक्रीत वाढ होते. पुण्यातील वाहनांच्या संख्येचा विचार केला तर विक्रीतदेखील लवकरच वाढ होईल.

वाहनांना लागतो किती वेळ :

वाहनाचा प्रकारसीएनजी टाकी क्षमतारांगेतला वेळइंधन भरण्यास लागणारा वेळ
रिक्षा३ किलो  २५ ते ३० मिनिटे४ ते ७ मिनिट
चारचाकी८ किलो३० ते ४० मिनिटे७ ते १० मिनिट
अवजड वाहने३० किलो४० ते ४५ मिनिटे१० ते १३ मिनिट

 

टॅग्स :PuneपुणेPetrol Pumpपेट्रोल पंपauto rickshawऑटो रिक्षा