कात्रज येथील एकाच सोसायटीतील ६ फ्लॅट फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:29 IST2020-12-11T04:29:56+5:302020-12-11T04:29:56+5:30

पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सिल्व्हर ओक सोसायटीत पहाटे शिरलेल्या चोरट्यांनी ६ फ्लॅट फोडल्याची घटना घडली. या प्रकरणी भारती विद्याापीठ ...

6 flats of the same society in Katraj were demolished | कात्रज येथील एकाच सोसायटीतील ६ फ्लॅट फोडले

कात्रज येथील एकाच सोसायटीतील ६ फ्लॅट फोडले

पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील सिल्व्हर ओक सोसायटीत पहाटे शिरलेल्या चोरट्यांनी ६ फ्लॅट फोडल्याची घटना घडली. या प्रकरणी भारती विद्याापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सिल्व्हर ओक सोसायटीत १८२ फ्लॅटस आहे. सोसायटीच्या मागील बाजुस असलेले तारेचे कुंपण तोडून पहाटे चोरटे आवारात शिरले. चोरट्यांनी सोसायटीतील ६ बंदफ्लॅटचे कुलुप तोडून ऐवज लांबविला. गुरूवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर रहिवाशांनी या घटनेची माहिती भारती विद्याापीठ पोलिसांना दिली. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोसायटीच्या आवारातील चित्रीकरण पडताळले. चित्रीकरणात चोरट्यांनी चेहरा कापडाने झाकल्याचे आढळून आले आहे. सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या परिसरात रात्रपाळीत रखवालदार होता. चोरटे सोसायटीच्या मागील बाजुचे कुंपण तोडून आत शिरले. घरफोडी करून चोरटे मागील बाजूने पसार झाल्याचा संशय आहे.

Web Title: 6 flats of the same society in Katraj were demolished