ओतूर परिसरात ६ कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:10 IST2021-04-05T04:10:51+5:302021-04-05T04:10:51+5:30

ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेत रविवारी ओतूर शहरात ३ ,हिवरे खुर्द २, तेजेवाडी १ असे ६ पाॅझिटिव्ह रुग्ण ...

6 corona positive in Ootur area | ओतूर परिसरात ६ कोरोना पाॅझिटिव्ह

ओतूर परिसरात ६ कोरोना पाॅझिटिव्ह

ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्र कक्षेत रविवारी ओतूर शहरात ३ ,हिवरे खुर्द २, तेजेवाडी १ असे ६ पाॅझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. परिसरातील बाधितांची एकूण संख्या १ हजार १०७ झाली आहे, पैकी ९५५ बरे झाले आहेत, ७८ जण कोविड सेंटर तर २५ जण घरीच उपचार घेत आहेत, ४९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ओतूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी सारोक्ते यांनी दिली.

शनिवारी ८ रविवारी ३ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या ५७२ झाली आहे ४८१ बरे झाले आहेत ५३ जण कोविड सेंटर तर १४ जण घरीच उपचार घेत आहेत. २४ जणांचा मृत्यू झाला आहे. हिवरे खुर्द येथे शनिवारी २ रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या ४२ झाली असून त्यातील ३४ बरे झाले आहेत. ४ जण कोविड सेंटरमध्ये तर १ जण घरीच उपचार घेत आहे. . तेजेवाडी येथे १ रुग्ण सापडल्याने तेथील बाधितांची संख्या ५२ झाली आहे. त्यातील ४९ बरे झाले आहेत १ जण कोविड सेंटर तर १ जण घरीच उपचार घेत आहे. ३ जणांचा मृत्यू झाला आहे, असे डॉक्टर सारोक्ते यांनी सांगितले.

Web Title: 6 corona positive in Ootur area