पालिकेकडून ६ सल्लागार काळ्या यादीत
By Admin | Updated: June 19, 2014 05:17 IST2014-06-19T05:17:03+5:302014-06-19T05:17:03+5:30
महापालिकेतील काही सल्लागारांनी काँक्रीट रस्त्यांच्या कामांचे चुकीचे व वाढीव दरपत्रक (इस्टिमेट) तयार केले.
_ns.jpg)
पालिकेकडून ६ सल्लागार काळ्या यादीत
पुणे : महापालिकेतील काही सल्लागारांनी काँक्रीट रस्त्यांच्या कामांचे चुकीचे व वाढीव दरपत्रक (इस्टिमेट) तयार केले. त्यामुळे ठेकेदाराची जादा दराने बिले मंजूर होऊन महापालिकेचे अर्थिक नुकसान होण्याचा ठपका सहा सल्लागारांवर ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या लेखा परीक्षणातून हा प्रकार उजेडात आल्यानंतर संबंधितांवर दोन वर्षे निलंबनाची कारवाई करून त्यांना काळ््या यादीत टाकण्यात आले आहे.
पथ विभागाने रस्त्याची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होण्यासाठी सल्लागारांची नियुक्ती केली आहे. ठेकेदारांचे दरपत्रक व बिले तपासून अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सल्लागारांना मानधन दिले जाते. प्रत्यक्षात मात्र सल्लागारांनी ठेकेदारांच्या फायद्यासाठी जादा दराची बिले तयार करून महापालिकेचे अर्थिक नुकसान करण्याचा प्रयत्न लेखा परीक्षणातून उजेडात आला आहे. त्यामुळे संबंधित कामांचे सल्लागार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक अविनाश बागवे यांनी केली होती. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी त्याविषयी चौकशीचे आदेश दिले होते. प्रथमदर्शनी चूक झाल्याचे निदर्शनास आल्याने सहा सल्लागारांना दोन वर्षांसाठी निलंबित करून काळ््या यादीत टाकले आहे. (प्रतिनिधी)