पुणे महापालिकेच्या क्रीडा शिष्यवृत्तीसाठी ५९ खेळाडू पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 07:47 PM2019-02-01T19:47:09+5:302019-02-01T19:50:52+5:30

महापालिकेच्या नवीन सुधारीत क्रीडा धोरणानुसार उल्लेखनीय कामगिरी करणा-या खेळांडूना देण्यात येणा-या क्रीडा शिष्यवृत्तीसाठी ५९ खेळाडूचे अर्ज पात्र ठरले आहेत.

59 players eligible for Sports Scholarship for Pune Municipal Corporation | पुणे महापालिकेच्या क्रीडा शिष्यवृत्तीसाठी ५९ खेळाडू पात्र

पुणे महापालिकेच्या क्रीडा शिष्यवृत्तीसाठी ५९ खेळाडू पात्र

Next
ठळक मुद्देनवीन क्रीडा धोरणाची अंमलबजावणी सुरु ; ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती सन २०१९-२० वर्षांसाठी शहरातील १०१ खेळाडूने शिष्यवृत्तीसाठी केले होते अर्ज

पुणे: महापालिकेच्या नवीन सुधारीत क्रीडा धोरणानुसार उल्लेखनीय कामगिरी करणा-या खेळांडूना देण्यात येणा-या क्रीडा शिष्यवृत्तीसाठी ५९ खेळाडूचे अर्ज पात्र ठरले आहेत. सन २०१९-२० वर्षांसाठी शहरातील १०१ खेळाडूने शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते. गुरुवारी (दि.१) रोजी झालेल्या क्रीडा समितीच्या बैठकीत पात्र खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्यास मान्याता देण्यात आली, अशी माहिती क्रीडा समितीचे अध्यक्ष राहूल भंडारे यांनी दिली. महापालिकेकडून शहरातील उल्लेखनीय कामगारी करणा-या उद्योन्मुख खेळाडूंना ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. यंदाच्या शिष्यवृत्तीसाठी सुमारे १०० अर्ज आले होते. त्यातील ५२ अर्ज पात्र झाले असून उर्वरित ४८ अर्ज अपात्र ठरले आहेत. मात्र, अनेक खेळाडूंना महापालिकेने दिलेल्या वेळेत कागदपत्रे सादर न करता आल्याने त्यांनी शहरासाठी योगदान देऊनही या शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तसेच काही खेळाडूंनी महापालिकेने मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही केलेली होती. त्यानंतर, ज्या खेळाडूंकडे कागदपत्रे आहेत. मात्र, केवळ मुदतीत ती त्यांना देता आली नाहीत. त्यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. ही माहिती खेळाडूंना व्हावी यासाठी क्रीडा विभागाकडून या खेळाडूंशी संपर्क साधून त्यांना कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना देण्याचा निर्णय घेत ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतवाढीचा फायदा आणखी ७ खेळाडूंना झाला असून या शिष्यवृत्तीसाठी ५९ खेळाडू पात्र झाले असल्याचे भंडारे यांनी स्पष्ट केले. त्यानुसार, या खेळाडूंना जिल्हास्तर ते आंतराष्ट्रीय खेळाडू अशा गटात विभागून दहा हजार ते ५० हजार रूपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. 
--------------------  
सुधारीत क्रीडा धोरणामुळे खेळाडूंना फायदा
शहरामध्ये क्रीडा संस्कृती अधिक प्रमाणात रुजविण्यासाठी सन २०१३ मध्ये महापालिकेने स्वंतत्र क्रीडा धोरण तयार केले. यामध्ये अनेक त्रुटी असल्याने महापालिकेने सुधारीत नवीन क्रीडा धोरणास मंजुरी दिली. या नवीन क्रीडा धोरणाचा शहरातील खेळाडूना चांगला फायदा होणार असून,  या धोरणात केलेल्या बदलामुळेच ही शिष्यवृत्ती देणे शक्य झाले आहे. या सुधारीत धोरणाच्या माध्यमातून भविष्यात जास्तीत जास्त खेळाडूंना आर्थिक सहकार्य मिळण्यास मदत होईल. 
- राहूल भंडारे, अध्यक्ष, क्रीडा समिती  

Web Title: 59 players eligible for Sports Scholarship for Pune Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.