शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

कुकडीत ५९.५३ टक्के पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 01:42 IST

कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांच्या पाणलोटक्षेत्रात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणीसाठा वाढत आहे.

नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांच्या पाणलोटक्षेत्रात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणीसाठा वाढत आहे. सर्व धरणांमध्ये एकूण १८ हजार १७९ द.ल.घ.फूट उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी १२.२४ टक्के पाणीसाठा कमी आहे. सर्व धरणांमध्ये ५९.५३ टक्के पाणी साठले आहे. सर्व धरणांपैकी डिंभा धरण ८८.४२ टक्के भरले आहे, अशी माहिती नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभागक्र.०१ चे कार्यकरी अभियंता के. आर. कानडे यांनी दिली.या वर्षी जुन्नर तालुक्यात चांगल्या पावसाला सुरुवात झाल्याने माणिकडोह, पिंपळगाव जोगा आणि डिंभे या तीन धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे पाणी येण्यास सुरवात झाली आहे. सर्व धरणांत एकूण १८ हजार १७९ द.श.घ.फूट म्हणजेच ५९.५३ टक्क पाणी साठले आहे. येडगाव धरण ५८.९६ टक्के भरले आहे. या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात १ जूनपासून आजअखेर ३३७ मि.मी.पाऊस झालेला आहे.वडज धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ५९.३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून आजअखेर २९७ मि.मी.पाऊस झाला असून २४ तासांत २ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पिंपळगाव जोगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मृतसाठा होता, परंतु या धरणात मृतसाठा भरून उपयुक्त पाणीसाठा येण्यास सुरुवात झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ४ द.ल.घ.फूट म्हणजेच ०.४७ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जून पासून आजअखेर ४९२ मिमी पाऊस या धरणक्षेत्रात झालेला आहे.चोवीस तासांत २६ मिमी पाऊस झाला आहे.माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ४५.६३ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून, धरणाच्या पाणलोटक्षेत्रात १ जूनपासून आजअखेर ४९६ मि.मी.पाऊस झालेला आहे. २४ तासांत १९ मिमी पाऊस झाला आहे.आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणात ११ हजार ४७ द.ल.घ.फूट म्हणजेच ८८.४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. धरणाच्या पाणलोटक्षेत्रात १ जूनपासून आजअखेर ७०० मिमीपाऊस झालेला आहे. २४तासांत ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती कार्यकरी अभियंता कानडे व शाखा अभिंयता ज. डी. घळगे यांनी दिली .

टॅग्स :DamधरणPuneपुणे