म्हाडाच्या ५ हजार ६०० घरांसाठी ५३ हजार ४७३ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:33 IST2021-01-08T04:33:27+5:302021-01-08T04:33:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या ५ हजार ६५७ घरांसाठी पुणे ...

म्हाडाच्या ५ हजार ६०० घरांसाठी ५३ हजार ४७३ अर्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या ५ हजार ६५७ घरांसाठी पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा) च्या वतीने २२ जानेवारीला रोजी सकाळी १० वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन सोडत काढण्यात येणार आहे.
या सोडतीसाठी आतापर्यंत तब्बल ५३ हजार ४७३ अर्ज आले आहेत. आता अखेरचे पाच दिवस शिल्लक असून, जास्तीत जास्त नागरिकांनी अर्ज करावेत, असे आवाहन म्हाडाचे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी केले.
या सोडतीमध्ये म्हाडाचे स्वत:च्या घरांसह ४८ नामांकित बांधकाम व्यावसायिकांकडून म्हाडाला २० टक्क्यांमध्ये दिलेल्या १ हजार ४३० घरांचा समावेश असल्याचे माने-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यासाठी ११ जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त इच्छुकांनी ११ जानेवारी २०२१च्या रात्री ११.५९ वाजेपर्यंत https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी, असे माने-पाटील यांनी सांगितले.
म्हाडाच्या ऑनलाईन लाॅटरीला खूप मोठा प्रतिसाद मिळाला असून, एका घरासाठी सुमारे १०-११ अर्ज आले आहेत. आणखी पाच दिवस शिल्लक असून जास्तीत जास्त अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे.