तलवारीच्या धाकाने व्यापाऱ्याचे ५२ हजार लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 01:54 AM2018-06-19T01:54:59+5:302018-06-19T01:54:59+5:30

इंदापूरहून अकलूजकडे जात असताना टेम्पोला दुचाकी आडवी लावून चामडे व्यापा-याला तलवार गळ्याला लावून पाच जणांनी लुटल्याचा प्रकार विठ्ठलवाडी (ता. इंदापूर) येथे पहाटे घडल्याची फिर्याद इंदापूर पोलिसांत दाखल झाली आहे.

52,000 robbers of the merchant killed by the sword | तलवारीच्या धाकाने व्यापाऱ्याचे ५२ हजार लुटले

तलवारीच्या धाकाने व्यापाऱ्याचे ५२ हजार लुटले

Next

इंदापूर : इंदापूरहून अकलूजकडे जात असताना टेम्पोला दुचाकी आडवी लावून चामडे व्यापा-याला तलवार गळ्याला लावून पाच जणांनी लुटल्याचा प्रकार विठ्ठलवाडी (ता. इंदापूर) येथे पहाटे घडल्याची फिर्याद इंदापूर पोलिसांत दाखल झाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे : अबुबकर उमर शेख (वय २२, रा. नाना पेठ, पुणे) हे चामड्याचे व्यापारी पुण्याहून इंदापूर मार्गे अकलूज येथे आठवडेबाजारात चामडेखरेदीसाठी टेम्पोने (एमएच १२-जे एफ १९०३) चालले होते. इंदापूरहून अकलूजकडे जात असताना पहाटे गलांडवाडी नं. २ हद्दीतील विठ्ठलवाडी येथे टेम्पोला दुचाकी गाडी आडवी लावून ५ इसम गाडीच्या दोन्ही बाजूंनी गाडीत चढले. गळ्याला तलवार लावून खिशातील रोख ५० हजार रुपये खिसा फाडून काढून घेतले. शर्टच्या वरच्या खिशातील २ हजार रुपये हिसकावून काढून घेतले. टेम्पोची किल्ली काढून अकलूजच्या दिशेने ते गेल, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: 52,000 robbers of the merchant killed by the sword

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे