इंदापूर लोकन्यायालयात ५२ खटले निकाली

By Admin | Updated: November 17, 2016 02:11 IST2016-11-17T02:11:44+5:302016-11-17T02:11:44+5:30

तालुका विधी सेवा समिती व वकील संघटनेच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय महा लोकअदालतमध्ये ५२ खटले निकाली निघाले.

52 cases were filed in Indapur local court | इंदापूर लोकन्यायालयात ५२ खटले निकाली

इंदापूर लोकन्यायालयात ५२ खटले निकाली

इंदापूर : तालुका विधी सेवा समिती व वकील संघटनेच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर न्यायालयात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय महा लोकअदालतमध्ये ५२ खटले निकाली निघाले. करपात्र १ लाख २३ हजार २८१ रुपयांची वसुली झाली.
इंदापूर न्यायालयाचे मुख्य दिवाणी न्यायाधीश अ. अ. शेख यांच्या हस्ते या राष्ट्रीय महालोक अदालतीचे उद्घाटन झाले. या राष्ट्रीय महालोक अदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी, कौटुंबिक व दाखलपूर्व तीन हजार खटल्यांचा विचार होणार आहे. पक्षकारांनी हे खटले मिटवले, तर या सर्वांचा वेळ व पैसा वाचणार आहे. मानसिक त्रासातून सुटका होणार आहे, असे ते या वेळी म्हणाले.
सहदिवाणी न्यायाधीश पी. एन. कुलकर्णी म्हणाले, की लोकन्यायालयाच्या माध्यमातून पक्षकारांनी एक पाऊल पुढे यावे. आपसातील वाद मिटवावेत. वाद मिटल्यानंतर त्यावर अपील राहणार नाही. प्रास्ताविक करताना वकील संघटनेचे अध्यक्ष एच. डी. नरुटे म्हणाले, की या लोकअदालतीमध्ये पक्षकार व बँक, महावितरण विभाग यांनी आपसातील वाद मिटवून तडजोड करावी.वकील संघटनेचे सचिव अ‍ॅड. माधव शितोळे यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. आसिफ बागवान यांनी आभार मानले. अ‍ॅड. आर. एस. सोमवंशी,अ‍ॅड. एन. एस. शहा, अ‍ॅड. एल. आर. शेख,अ‍ॅड. विनोद पारेकर, अ‍ॅड. आर. आर. शुक्ल, अ‍ॅड. व्ही. एस. देवकर, अ‍ॅड. एम. एल. आदलिंग, अ‍ॅड. आर. डी. कोकरे, अ‍ॅड. जे. एम. वाघमारे, अ‍ॅड. ए. एस. तोरसकर, अ‍ॅड. शशिकांत साबळे, अ‍ॅड. आर. यु. चौधरी यांनी या लोक अदालतीमध्ये सहकार्य केले.

Web Title: 52 cases were filed in Indapur local court