दुकानातून ५0 हजारांच्या बॅटऱ्यांची चोरी

By Admin | Updated: June 29, 2017 03:34 IST2017-06-29T03:34:12+5:302017-06-29T03:34:12+5:30

येथील पुणे-नाशिक महामार्गालगत असणाऱ्या बॅटरीच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ५० हजार रुपये किमतीच्या ७ बॅटऱ्या

50,000 pirate stolen from the shop | दुकानातून ५0 हजारांच्या बॅटऱ्यांची चोरी

दुकानातून ५0 हजारांच्या बॅटऱ्यांची चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर : येथील पुणे-नाशिक महामार्गालगत असणाऱ्या बॅटरीच्या दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ५० हजार रुपये किमतीच्या ७ बॅटऱ्या; तसेच इतर साहित्य चोरून नेले. यासंदर्भात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : शोऐब मोहमंदहालिम शेख यांचे पुणे-नाशिक महामार्गालगत हॉटेल मनोरंजनसमोर ए-वन बॅटरी हे दुकान आहे. सोमवारी रमजान ईद असल्याने शेख यांनी दुकान उघडले नाही. रात्री ९ वाजल्याच्या सुमारास जालिंदर यांनी फोन करून, ‘माझा बी. टी. कंपनीचा टेम्पो फेल झाला आहे. तुम्ही दुकानावर या’ असा निरोप त्याने दिला. त्यानंतर शोऐब शेख दुकानावर गेले. काम झाल्यावर दुकानाला बाहेरून लॉक करून ते झोपण्यासाठी घरी गेले. मंगळवारी सकाळी ७ वाजता शेख दुकान उघडण्यासाठी गेले असता, अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे बाहेरील लॉक तोडून आत प्रवेश केल्याचे आढळले. दुकानातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते.

Web Title: 50,000 pirate stolen from the shop