शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या वैद्यकीय तपासणीचा वर्षभरात ५० हजार रुग्णांना फायदा  

By राजू हिंगे | Updated: January 14, 2025 11:17 IST

विशेष म्हणजे शासकीय दरापेक्षा कमी दराने होणाऱ्या वैद्यकीय तपासणीसाठी कुठल्याही कागदपत्राची गरज नाही.

पुणे : महापालिकेच्या पद्मावती येथील शिवशंकर पोटे दवाखाना, कोथरूड येथील सुतार दवाखाना आणि कमला नेहरू रुग्णालय येथे शासकीय दरापेक्षा (सीजीएचएस) ५ ते ८ टक्के कमी दराने एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी, एक्स-रे आणि रक्ताच्या विविध चाचण्याचा वर्षभरात सुमारे ५० हजार रुग्णांना फायदा होताे. विशेष म्हणजे शासकीय दरापेक्षा कमी दराने होणाऱ्या वैद्यकीय तपासणीसाठी कुठल्याही कागदपत्राची गरज नाही.

वैद्यकीय तपासण्या आणि उपचार गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना परवडत नाहीत. त्यामुळे महापालिकेने पद्मावती येथील शिवशंकर पोटे दवाखाना एमआरआय, सिटी स्कॅन, सोनोग्राफी आणि एक्स-रे ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महापालिकेने क्रस्ना डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून पीपीपी तत्त्वावर कोथरूड येथील सुतार दवाखाना आणि कमला नेहरू येथील दवाखाना येथे ही वैद्यकीय तपासण्या होत आहेत.सीजीएचएसदरापेक्षा म्हणजे सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा ५ ते ८ टक्के कमी दराने या तपासणी होत आहेत. एखाद्या रुग्णाला खासगी दवाखान्यांमध्ये एमआरआय करण्यासाठी ५ हजार ४०० रुपये खर्च येत असेल, तर हाच एमआरआय येथे २ हजार १०० रुपयांत होत आहे. एक्स रे करण्यासाठी खासगी रुग्णालयात ४०० रुपये खर्च येतो. या केंद्रामध्ये केवळ ६६ रुपयांमध्ये एक्स रे होतो.

शासकीय दरापेक्षा कमी दराने होते ॲंजाेप्लास्टी, बायपास

पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील जुन्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर टीएचएस वेलनेस प्रा. लि. यांनी हृदयरोगावर तपासणी आणि उपचाराचा संयुक्त केंद्र सुरू केले आहे. सीजीएचएस दराच्या पाच टक्के कमी दराने हृदयरोगावरील सर्व तपासण्या, उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येतात. हृदयरोगावरील इतर सर्व अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत. हृदयाची सोनोग्राफी, ईसीजी, स्ट्रेस टेस्ट यासुद्धा शासकीय दरात होतात. या केंद्रात १ लाख ६५ हजार रुग्णांनी येथे तपासण्या, उपचार किंवा शस्त्रक्रिया केल्या आहेत. या केंद्रात राज्य सरकारची महात्मा फुले आरोग्य योजना, महापालिकेची शहरी गरीब आरोग्य योजनेचा लाभ घेता येतो.

  पुणे महापालिकेच्या वतीने शहरी गरीब योजना राबविली जात आहे. या योजनेचा लाभ मिळालेल्या नागरिकांना वैद्यकीय तपासणी केंद्रामध्ये तपासणीच्या दरावर ५० टक्के सूट मिळते. तसेच, केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या म्हणते सीजीएचएस दरापेक्षा ५ ते ८ टक्के कमी दराने वैद्यकीय तपासण्या केल्या जातात. त्यासाठी कुठल्याही कागदपत्राची गरज नाही.  - डॉ. संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका.

 शिवशंकर पोटे दवाखाना

(एप्रिल ते डिसेंबर २०२४)

एमआरआय ४,५६८

सीटी स्कॅन १,२५३

एक्स रे ५,७४९

सोनाग्राफी ३,६०५

टूडी ईको ३१६

 क्रिष्ना डायनॉस्टिक (२०२४)

एमआरआय २,८१७

सीटी स्कॅन ८९२

एक्स रे १८,५७६

 कमला नेहरू रुग्णालय हृदय रोग (ऑक्टोबर २०१७ ते २०२४ डिसेंबर)

ॲंजाेग्राफी ६,०००

ॲंजाेप्लास्टी ४,०००

बायपास/ वाॅल रिप्लेसमेंट ५००

पेसमेकर २०० 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडHealthआरोग्यHeart DiseaseहृदयरोगMuncipal Corporationनगर पालिका