शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावर शौच करताना पकडल्यास ५०० रुपये दंड; आळंदी नगरपरिषदेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 13:00 IST

तीर्थक्षेत्र आळंदी-देवाची (ता. खेड) नगर परिषद हद्दीत उघड्यावर शौच करताना पकडल्यास पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे, असा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली.

ठळक मुद्देसार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे, लघुशंका करणे आदींवरही कारवाई करण्याचा निर्णयआळंदी नगर परिषदेने जाहिरातींमार्फत नागरिकांना केले सूचित

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी-देवाची (ता. खेड) नगर परिषद हद्दीत उघड्यावर शौच करताना पकडल्यास पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे. राज्य सरकारने नुकत्याच तयार केलेल्या नव्या नियमावलीत याबाबतचा कायदा करून संबंधित नगर परिषद व पालिकांना याबाबत सूचना करून संबंधित नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे, लघुशंका करणे आदींवरही दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली.राज्य सरकारच्या शहर विकास विभागाने प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार, सरकारने कचरा व्यवस्थापन कायदा २०१६ची महापालिका आणि नगर परिषद परिक्षेत्रात तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यात राज्यातील अ, ब, क आणि ड श्रेणीतील महापालिकांसाठी दंडात्मक कारावाईची रक्कम एकच ठेवण्यात आली आहे.नव्या निर्णयानुसार, कोणतीही व्यक्ती किंवा संस्था कचरा फेकून परिसर अस्वच्छ करीत असेल, तर दोषी व्यक्तींकडून १५० रुपये दंड वसूल केला जाईल, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींकडूनही १०० रुपये दंड वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांकडून १०० रुपयांपर्यंतचादंड वसूल केला जाईल. विशेष म्हणजे, उघड्यावर शौचास जाणाऱ्यांकडून सर्वाधिक ५०० रुपये दंड वसूल करण्याचे आदेशही यामार्फत देण्यात आले आहेत. आळंदी नगर परिषदेने या नियमांचे पालन करण्यासाठी जाहिरातींमार्फत नागरिकांना सूचित केले आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे भूमकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार