विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेचा ५० टक्के विद्यार्थ्यांकडून सराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:10 IST2021-07-11T04:10:05+5:302021-07-11T04:10:05+5:30
एसपीपीयु एज्युटेक फाऊंडेशनतर्फे ९ जुलै रोजी सुमारे ३ लाख विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा १ लाख ...

विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेचा ५० टक्के विद्यार्थ्यांकडून सराव
एसपीपीयु एज्युटेक फाऊंडेशनतर्फे ९ जुलै रोजी सुमारे ३ लाख विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा १ लाख ७२ हजार १३३ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या दरम्यान २ हजार ५०० फोन कॉल्स व ५०० पेक्षा जास्त चॅट रिक्वेस्ट आल्या होत्या. त्यात कॅमेरा कसा सेट करावा, यूजर आयडी, पासवर्ड यासारख्या माहिती विचारणारे प्रश्न विचारण्यात आले. या परीक्षेदरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही. एसपीपीयु एज्युटेक फाऊंडेशनसह परीक्षा विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची ७० पेक्षा जास्त जणांची टीम या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यरत होती.
विज्ञान विद्याशाखेच्या १ लाख ४ हजार २३३ विद्यार्थ्यांपैकी ६० हजार १८१ विद्यार्थ्यांनी तर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या १ लाख ६६ हजार ४९३ विद्यार्थ्यांपैकी ९१ हजार ११३ विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली. तसेच फार्मसी अभ्यासक्रमाच्या २१ हजार ९०४ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ५९५ तर व्यवस्थापन विद्याशाखेच्या ७ हजार विद्यार्थ्यांपैकी ४ हजार २४४ विद्यार्थ्यांनी सराव परीक्षेचा लाभ घेतला.