शिवा काशीद स्मारकासाठी ५० लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:08 IST2021-06-23T04:08:24+5:302021-06-23T04:08:24+5:30

बारामती तालुक्यातील पणदरे येथे बहुजन समाजाच्या घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या वेळी ...

50 lakh fund for Shiva Kashid memorial | शिवा काशीद स्मारकासाठी ५० लाखांचा निधी

शिवा काशीद स्मारकासाठी ५० लाखांचा निधी

बारामती तालुक्यातील पणदरे येथे बहुजन समाजाच्या घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या वेळी नाभिक समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात आमदार गोपीचंद पडळकर यांना निवेदन देण्यात आले. पडळकर म्हणाले की, शिवा काशीद स्मारकासाठी माझ्या फंडातून २५, तर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या फंडातून २५ मिळून ५० लाखांचा निधी वर्ग झालेला आहे. येत्या वर्ष भरात ही दोन्ही स्मारकांची कामे मार्गी लागतील असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रीय नाभिक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष दिलीप जाधव, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मारूती कर्वे, बारामती तालुका अध्यक्ष महेश काशिद आणि बीडचे महादेव राऊत आदींसह बहुजन समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: 50 lakh fund for Shiva Kashid memorial