पारगावच्या इंग्रजी शाळेत पहिल्याच दिवशी ५० प्रवेश

By Admin | Updated: June 18, 2015 22:47 IST2015-06-18T22:47:11+5:302015-06-18T22:47:11+5:30

पारगाव येथील प्राथमिक शाळा हायटेक झाल्याने इंग्रजी माध्यमासाठी पहिल्याच दिवशी ५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती मुख्याध्यापक रवींद्र पोटे यांनी दिली.

50 admissions on the very first day in Pargaon English School | पारगावच्या इंग्रजी शाळेत पहिल्याच दिवशी ५० प्रवेश

पारगावच्या इंग्रजी शाळेत पहिल्याच दिवशी ५० प्रवेश

केडगाव : पारगाव येथील प्राथमिक शाळा हायटेक झाल्याने इंग्रजी माध्यमासाठी पहिल्याच दिवशी ५० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती मुख्याध्यापक रवींद्र पोटे यांनी दिली.
या शाळेने नव्याने इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली आहे. यामध्ये ई-लर्निंग, संगणक, अद्ययावत इमारत, शिक्षक वर्ग, बाक, खेळण्यासाठी मैदान यासारख्या सुविधांची जाहिरात केली. त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी अक्षरश: विद्यार्थी व पालकांच्या प्रवेशासाठी रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे, इंग्रजी माध्यामाच्या परिसरातील खासगी शाळा सोडून पालकांनी आपल्या या शाळेत घालणे पसंत केले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन बोत्रे यांनी सांगितले, की पालकांच्या व ग्रामस्थांच्या आर्थिक सहभागातून शाळेत विविध सुधारणा केल्या जातात. त्यातूनच चालू वर्षी इंग्रजी माध्यम सुरू करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: 50 admissions on the very first day in Pargaon English School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.