बारामतीमध्ये अंगावर ट्रॅक्टर घालून पाच वर्षांच्या बालकाला चिरडले

By Admin | Updated: February 23, 2016 00:46 IST2016-02-23T00:46:02+5:302016-02-23T00:46:02+5:30

अंगावर ट्रॅक्टर घालून पाच वर्षांच्या बालकाचा खून केल्याची घटना सोमवारी लिमटेक येथे घडली. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकास अटक केली असून, त्याच्यावर खुनासह अ‍ॅट्रोसिटीचा

A 5-year-old girl was crushed by wearing a tractor on her body in Baramati | बारामतीमध्ये अंगावर ट्रॅक्टर घालून पाच वर्षांच्या बालकाला चिरडले

बारामतीमध्ये अंगावर ट्रॅक्टर घालून पाच वर्षांच्या बालकाला चिरडले

बारामती : अंगावर ट्रॅक्टर घालून पाच वर्षांच्या बालकाचा खून केल्याची घटना सोमवारी लिमटेक येथे घडली. पोलिसांनी ट्रॅक्टर चालकास अटक केली असून, त्याच्यावर खुनासह अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून आरोपीने कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपीवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी विविध संघटनांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता.
पोलिसांच्या माहितीनुसार, या मुलाचे वडील सागर खिलारे (२५, रा. लिमटेक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी रामचंद्र उर्फ बापू देवकाते (रा. लिमटेक) यास अटक करण्यात आली आहे. खिलारे हे शेतमजूर आहेत. ते वास्तव्यास असलेली जागा त्यांनी आरोपी देवकाते यास दिली नाही. या कारणावरून आरोपीने जातीवाचक उल्लेख करून, ‘तुम्ही गाव सोडून जा, नाहीतर मी त्याचा बदला घेईन,’ अशी धमकी दिली होती. आज सकाळी ११ वाजता ओम हा येथील झाडाखाली बसला असताना, त्याने त्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून खून केला. ओम याच्या डोक्यावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. (प्रतिनिधी)

Web Title: A 5-year-old girl was crushed by wearing a tractor on her body in Baramati