माकड पळविणारे ५ जण शरण
By Admin | Updated: July 1, 2015 01:57 IST2015-07-01T01:57:31+5:302015-07-01T01:57:31+5:30
महाड-पंढरपूर रस्त्यावरील वरंध घाटातून माकड पळवून घेऊन नेणारे ५ जण मंगळवारी दुपारी भोर येथील वन विभागाच्या कार्यालयात शरण आले़

माकड पळविणारे ५ जण शरण
भोर (जि.पुणे) : महाड-पंढरपूर रस्त्यावरील वरंध घाटातून माकड पळवून घेऊन नेणारे ५ जण मंगळवारी दुपारी भोर येथील वन विभागाच्या कार्यालयात शरण आले़ त्यांना भोरच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची वन विभागाची कोठडी देण्यात आली आहे.
दिलीप उर्फ मारुती घिसरे (३५), संभाजी संतोष घिसरे (३२), चांगदेव विठ्ठल घिसरे (२६), नितीन पंढरीनाथ घिसरे (२२) रमेश सुभाष कटके (२९, सर्व रा़ भिवरी ता. पुरंदर जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत़
२० जून रोजी दीपक घिसरे व इतर ४ जण कोकणात फिरायला गेले होते. वरंध घाट चढून वर आल्यावर वाघजाई मंदिरासमारेच्या संरक्षक भिंतीवर माकडे उभी असतात़ त्यांनी माकडाच्या पिल्लाला खाण्याचे लालूच देऊन गाडीच्या डिक्कीत टाकून पळवून नेले. एका प्राणीमित्राने याचे चित्रीकरण करून सर्वत्र सोशल मिडियावर पाठवल्यावर याची मोठया प्रमाणात चर्चा झाली आणि २३ जूनला वन विभागकडून भोर येथे या लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.