शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडीत १ लाखांचा ५ किलो गांजा जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 16:52 IST

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकांची कारवाई, एक जण अटकेत

ठळक मुद्देआरोपी कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मराठमोळा पान शॉप समोर पांढ-या रंगाचे नायलॉन पोते घेऊन संशयास्पद थांबलेला दिसल्यावर पोलिसांनी त्याला जागीच पकडले.

लोणी काळभोर: हवेली तालुक्यातील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकास अटक करून त्याच्याकडून १ लाख १० हजार रुपये किंमतीचा ५ किलो ५१८ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. शिवराज काशीनाथ बक्के ( वय ३९, रा, उस्मानाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ गैरव्यवहाराची माहिती काढण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक पुणे - सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील मराठमोळा पान शॉप समोर आले होते. त्याठिकाणी बक्के हा हातामध्ये पांढ-या रंगाचे नायलॉन पोते घेऊन थांबलेला दिसला. त्याच्या हालचाली पथकास संशयास्पद दिसून आल्या. पोलिसांनी त्याच्याकडे पाहताच तो घाई - घाईने निघून जाण्याचा प्रयत्न करु लागला. त्याच क्षणी संशयावरून पोलिसांनी त्याला जागीच पकडले.

बक्के जवळील पांढ-या नायलॉन पोत्याची झडती घेतल्यावर त्यामध्ये गांजा असल्याचे आढळून आले. त्याचे वजन आणि किंमतीची माहिती काढल्यावर १ लाख १० हजार रुपये किंमतीचा ५ किलो ५१८ ग्रॅम वजनाचा असल्याचे निष्पन्न झाले. तो जप्त करून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी त्याला लोणी काळभोर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.  

टॅग्स :PuneपुणेLoni Kalbhorलोणी काळभोरKhedखेडDrugsअमली पदार्थPoliceपोलिसArrestअटक