सीएनजी गॅससाठी ५ कोटींचा धनादेश
By Admin | Updated: June 4, 2015 05:34 IST2015-06-04T05:34:05+5:302015-06-04T05:34:05+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) बुधवारी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीला ५ कोटी रुपयांचा धनादेश दिला.

सीएनजी गॅससाठी ५ कोटींचा धनादेश
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) बुधवारी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीला ५ कोटी रुपयांचा धनादेश दिला. तसेच पुढील आठवड्यात ५ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिल्याने सीएनजी गॅस पुरवठा सुरू राहणार आहे.
‘एमएनजीएल’ने थकबाकी न मिळाल्यास गुरुवारपासून सीएनजी गॅसपुरवठा बंद करण्याचा इशारा पीएमपीला दिला होता. पीएमपीच्या ताफ्यात सीएनजीवर चालणाऱ्या सुमारे १२०० बस आहेत. गुरुवारपासून गॅसपुरवठा बंद झाला असता तर संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली असती. पीएमपीकडे तब्बल ३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार व एमएनजीएलचे संचालक वेदागिरी यांच्या याबाबत चर्चा झाली. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार कंपनीने गॅसपुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे घेतल्याची माहिती पीएमपीचे सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीण अष्टीकर यांनी दिली. (प्रतिनिधी)