शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

हडपसर येथील रेल्वे क्रॉसिंगवरील भुयारी मार्गासाठी पाच कोटी ८४ लाखांचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 11:28 IST

ससाणेनगर सय्यद नगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर होणारी वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून दोन भुयारी मार्ग करण्याचे नियोजन आहे.

ठळक मुद्देवाहतूक कोंडी सोडविण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव मंजूर येत्या आठ ते दहा दिवसात प्रत्यक्षात भुयारी मार्गाचे काम सुरू होऊन मार्चपर्यंत खुला

हडपसर: ससाणेनगर - सय्यद नगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर होणारी वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून दोन भुयारी मार्ग करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी लागणार निधी आज रेल्वे खात्याला देण्यात आला. आमदार योगेश टिळेकर यांच्या पुढाकारातून पुणे महानगरपालिकेच्या वतीने पाच कोटी ८४ लाखांचा निधीचा धनादेश आज रेल्वे अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.त्यामुळे येथील वर्षानुवर्षे रखडलेला प्रश्न मार्गी लागला आहे, आगामी सहा महिन्यात भुयारी मार्ग तयार होईल अशी आशा निर्माण झाली आहे.येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल करायचा की भुयारी मार्ग हा वादाचा प्रश्न बनला होता, त्यावर उपाय म्हणून ससाणेनगर येथील रेल्वे गेट वर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ससाणेनगर व काळेपडल याच्यामध्ये तसेच रामटेकडी व ससाणेनगर याच्या मध्ये एक भुयारी मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यासाठी रेल्वे खात्याला निधी देणे गरजेचे होते.  आज पुणे महानगरपालिकेच्या वतीने पाच कोटी 84 लाख रुपयांचा निधी रेल्वेचे वरिष्ठ अभियंता  सुरेश पाखरे यांच्याकडे आमदार टिळेकरांनी सुपूर्द केला.यावेळी नगरसेवक संजय घुले, पालिकेचे उपअभियंता दाभाडे, कनिष्ठ अभियंता  थोपटे,  जीवन जाधव, हेमंत ढमढेरे, योगेश ढोरे, शांताराम जाधव आदी उपस्थित होते.चौकटसय्यदनगर येथे भुयारी मार्ग मंजूर पालिकेने केला होता, परंतु भूसंपादनात अडचणी आल्याने काम रखडले, येथील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला होता, म्हणून गेली 4 वर्ष राज्यशासन, पुणे महापालिका व रेल्वे खात्याकडून पाठपुरावा करून पयार्यी दोन भुयारी मार्ग मंजूर करून घेतले, या भुयारी मागार्साठी सात ते आठ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून पहिल्या टप्प्यात पाच कोटी 84 लाख रुपयांचा धनादेश रेल्वे अधिकाºयांकडे सुपूर्त केला आहे येत्या आठ ते दहा दिवसात प्रत्यक्षात भुयारी मार्गाचे काम सुरू होऊन मार्चपर्यंत हा भुयारी मार्ग नागरिकांसाठी खुला करण्यात येईल त्यामुळे येथील वीस वर्षांपासूनचा वाहतूककोंडीचा प्रलंबित प्रश्न  सुटण्यास मदत होणार आहे. अशी माहिती आमदार योगेश टिळेकर यांनी  दिली रेल्वेची व्यवस्थापक पाखरे बोलताना म्हणाले की महापालिकेकडून या भुयारी मागार्साठी निधीचा धनादेश प्राप्त झाला आहे लवकरच या भुयारी मागार्चे काम सुरू करण्यात येईल व येथील वाहतूक कोंडी सोडवण्याबाबत रेल्वे प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहकायार्ने सकारात्मक पावले उचलली जातील.

टॅग्स :HadapsarहडपसरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाrailwayरेल्वेTrafficवाहतूक कोंडी