वेश्याव्यवसाय प्रकरणी ५ जणांवर गुन्हा

By Admin | Updated: March 24, 2017 03:57 IST2017-03-24T03:57:36+5:302017-03-24T03:57:36+5:30

वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याच्या कारणावरून बारामती शहर पोलिसांनी ५ जणांवर मंगळवारी अनैतिक व्यापार

5 cases of prostitution business case | वेश्याव्यवसाय प्रकरणी ५ जणांवर गुन्हा

वेश्याव्यवसाय प्रकरणी ५ जणांवर गुन्हा

बारामती : वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याच्या कारणावरून बारामती शहर पोलिसांनी ५ जणांवर मंगळवारी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. शहरातील फलटण रस्त्यावरील हॉटेल सरगम येथे पोलिसांनी छापा टाकला.
या कारवाईत ७ हजारांची रोख रक्कम, ११ मोबाईल हँडसेट, ३ मोटारसायकल असा एकूण दीड लाखाचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणातील पश्चिम बंगालमधील तिन्ही मुलींची महिला सुधारगृहात रवानगी केली आहे.
बारामतीत वेश्याव्यवसाय वाढल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हॉटेल सरगमवर छापा टाकून ही कारवाई केली. पोलिसांनी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर बनावट ग्राहक पाठविले, तेव्हा संदीप शिवाजी जराड (रा. उंडवडी), सारिका विजय यादव (रा. माळेगाव), सागर अशोक गोलांडे (रा. शिर्सुफळ) व राहुल मारुती पवार (रा. खंडोबानगर) हे चौघे सुशीला ऊर्फ चारू शरद लालबिगे (रा. एमआयडीसी) हिच्या सांगण्यावरून व मदतीने पश्चिम बंगालमधील ३ मुलींकडून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे निष्पन्न झाले. सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, फौजदार वर्षा जगदाळे, पोलीस कर्मचारी दशरथ कोळेकर, संदीप जाव, अमृता भोईटे, अंजना नागरगोजे, जालिंदर जाधव, रमेश केकाण यांच्या पथकाने ही कारवाई केली. जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजी चिखले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर, पोलीस निरीक्षक विजय जाधव यांनी पथकाला मार्गदर्शन केले.

Web Title: 5 cases of prostitution business case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.