शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वेल्हे तालुक्यात वीजेच्या धक्क्याने ५ म्हशींचा तडफडून मृत्यू; सुदैवाने मनुष्यहानी टळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 16:06 IST

तब्बल पाच लाखाहून अधिक रुपये किमंतीच्या म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्या शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ आली

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील पानशेत येथील श्री शिवाजी वीर बाजी पासलकर विद्यालयाजवळ रस्त्यावर पडलेल्या वीजेच्या तारेचा जोरदार धक्का बसून पानशेत धरणमाथ्यावरील वांजळवाडी येथील धरणग्रस्त शेतकरी दिलीप सोनबा जागडे यांच्या पाच म्हशींचा एकापाठोपाठ तडफडून मृत्यू झाला. ही दुर्घटना आज बुधवारी घडली. तब्बल पाच लाखाहून अधिक रुपये किमंतीच्या म्हशींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने जागडे यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. 

पानशेत विभाग महाविजतरण व स्थानिक पशुसंवर्धन विभागाने घटनास्थळी जाऊन मुत म्हशींचा पंचनामा, शवविच्छेदन केले. महावितरणचे विशेष निमंत्रित सदस्य सुनील गायकवाड यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांस शासन निर्णयानुसार तातडीने मदत द्यावी अशी मागणी केली आहे. दिलीप यांचे वडील सोनबा जागडे हे म्हशींना रानात चारण्यासाठी चालले होते. त्यांच्या समोरच म्हशींना विजेचा धक्का बसला .सोनबा जागडे हे प्रसंगसावधनता दाखवत तेथून बाजूला गेले. या रस्त्यावर विद्यार्थ्यांंसह नागरिकांची ये जा सुरू असते. जागडे यांनी सर्वांना सावध केले त्यामुळे मनुष्य हानी टळली.

महावितरणचे पानशेत शाखा अभियंता नितीन धस म्हणाले, विद्यालयाजवळ असलेल्या वीजेच्या लोंखडी खांबांवरील एक तार जमिनीवर पडली. त्यावेळी तेथून जात असलेल्या म्हशींना वीजेचा धक्का बसून त्यांचा मुत्यू झाला. खांबावरील तारा सुस्थितीत आहेत. मात्र म्हशीने खांबाला धक्का दिल्यामुळे ताण बसून तार तुटून खाली पडली असावी. शेतकरी शैलेश दिलीप जागडे म्हणाले, वीजेची तार अगोदरच पायी रस्त्यावर पडली होती. अजोबा सोनबा जागडे म्हशींना चारण्यासाठी घेऊन चालले होते. त्यावेळी पडलेल्या तारेच्या वीजेचा पुढे चालेल्या म्हशीला धक्का बसला. त्यामुळे म्हशीने हंबरडा फोडला. त्यामुळे दुसरी म्हैस तिच्या जवळ गेली. तिलाही वीजेचा धक्का दिला. असे एकापाठोपाठ पाच म्हशींना वीजेचा धक्का बसला. जोरदार हंबरडे फोडत तडफडून सर्वांचा मुत्यू झाला.

पानशेत पशुसंवर्धन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आदेश निकम यांनी शवविच्छेदन.केले. सर्व पाच म्हशींचा मुत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाजारभावानुसार एका मृत म्हशीची किमंत एक लाख रुपये आहे. याप्रमाणे पाच म्हशींचे पाच लाख रुपये किंमतीचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Puneपुणेbhor-acभोरelectricityवीजmahavitaranमहावितरणDeathमृत्यू