सराईत चोरट्यांकडून ५ दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:09 IST2021-06-28T04:09:38+5:302021-06-28T04:09:38+5:30

पुणे : रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीत आलेल्या सराईत चोरट्यांना पकडून वानवडी पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या ५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. ...

5 bikes seized from Sarait thieves | सराईत चोरट्यांकडून ५ दुचाकी हस्तगत

सराईत चोरट्यांकडून ५ दुचाकी हस्तगत

पुणे : रामटेकडी येथील औद्योगिक वसाहतीत आलेल्या सराईत चोरट्यांना पकडून वानवडी पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीच्या ५ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

रोशन दत्तात्रय पिसाळ (वय २७, रा. वाघोली) आणि योगेश गांधी अस्वले (वय १८, रा. मांजरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. वानवडी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सुधीर सोनवणे व अमित चिव्हे यांना वाहनचोरटे रामटेकडी औद्योगिक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार हवालदार राजू रासगे, नवनाथ खताळ, दीपक भोईर, गणेश खरात यांनी सापळा रचून दोघांना पकडले. त्याच्या ताब्यातील दुचाकीची चौकशी केल्यावर तीन काळेपडळ येथील म्हसोबा मंदिराजवळून चोरल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडून २ लाख रुपयांच्या ५ दुचाक्या जप्त केल्या आहेत वानवडी, लोणी काळभोर, हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ५ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, सावळाराम साळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: 5 bikes seized from Sarait thieves