पुणे : कोरेगाव-भीमा दंगल प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी तब्बल ११ महिन्यांनंतर ५ जणांवर तोडफोड करुन दुकान पेटविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे़ या प्रकरणातील दीड हजारांपेक्षा अधिक आरोपींच्या अटकेसाठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे़या प्रकरणी मंगल कैलास कांबळे (रा़ कोरेगाव भीमा) यांनी फिर्याद दिली आहे़ त्यांच्या फिर्यादीवरुन शिक्रापूर पोलिसांनी संग्राम बाळासाहेब ढेरंगे, प्रकाश अनिल काशिद, मुकुंद गव्हाणे, विशाल ऊर्फ भावड्या गव्हाणे व एका अनोळखी विरोधात गुन्हा दाखल केला आहे़मंगल कांबळे यांनी फिर्यादीत म्हटले की, १ जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्या व त्यांची दोन मुले चहा, नाष्ट्याचे वाटप करीत असताना संग्राम ढेरंगे व इतरांनी येऊन त्यांच्या घरावर दगडफेक करुन डेकोरेशनचे नुकसान केले़
कोरेगाव-भीमा दंगलप्रकरणी ५ जणांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 04:58 IST