शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीला अडथळा ठरेल असे वाहन लावल्यास ५ ते १५ हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 04:38 IST

पोलीस व महापालिकेची संयुक्त कारवाई सुरू: आतापर्यंत ११६ वाहनांवर कारवाई

पुणे : शहरामध्ये वाहतुकीला अडथळा होईल अशी रस्त्यावर लावण्यात आलेली वाहने, अनधिकृतपणे सोडून दिलेल्या वाहनांवर महापालिका आणि वाहतूक पोलीस यांच्या वतीने संयुक्तपणे कारवाई सुरु केली आहे. गेल्या पाच दिवसांपासून शहरामध्ये ही कारवाई सुरूअसून, आतापर्यंत ११६ वाहने उचलण्यात आली आहेत. अशा वाहनांना मोठ्या प्रणाणात दंड करण्यात येत असून, दुचाकीला ५ हजार, टेम्पो, रिक्षा १० हजार रुपये आणि कार, जीपसाठी तब्बल १५ हजार रुपयांचा दंड करण्यात येत आहे.याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप व वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी याबाबत संयुक्त पत्रकार परिषदेत कारवाईची माहिती दिली. याबाबत सातपुते यांनी सांगितले, की शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा ठरतील अशा पद्धतीने वाहने रस्त्यावर लावली जातात. तर अनेक वाहने बेवारसपणे रस्त्यांवरच सोडून दिली जातात. यामुळे शहरातील वाहतुकील अडथळा निर्माण होत असून, अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शहरातील बेवारस आणि वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. वाहतूक विभागाकडून करण्यात येणाºया कारवाईव्यतिरिक्त ही कारवाई असणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने वाहतूक शाखेला क्रेन, पार्किंगसाठी जागा, त्याचबरोबर सुरक्षारक्षक दिले आहे. संपूर्ण शहरामध्ये ही कारवाई सुरूराहणार आहे. अशा पद्धतीने शहरात पहिल्यांदाच कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी धोकादायक पद्धतीने वाहने लावू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे.महापालिकेच्या मदतीने शहरातील स्वारगेट, समर्थ, फरासखाना, विश्रामबागवाडा, खडक, कोथरूड, शिवाजीनगर, दत्तवाडी, वारजे या वाहतूक विभागातून एकूण ११६ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. ही वाहने नदीपात्रात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.वाहने सोडवण्यासाठी प्रथम अर्ज करावा लागणार आहे. घोले रस्ता आर्ट गॅलरी येथे दंड भरून वाहने सोडण्यात येतील.पेठांमधील नागरिकांच्या झोपा उडाल्यामहापालिका आणि वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण करणाºया आणि बेवारस वाहनांवर कारवाई सुरू आहे. शहरामध्ये प्रामुख्याने मध्यवस्तीत पार्किंगसाठी जागा नसल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावरच वाहने पार्किंग केली जातात.या पैकी वाहतुकीला अडथळा ठरणारी वाहनेदेखील या कारवाईअंतर्गत उचलण्यात आली आहेत. यामुळे पेठांमधील नागरिकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागण्याची शक्यता आहे. दंडाची रक्कम व कारवाईबाबत अनेक तक्रारी येण्यास सुरुवातझाली आहे.पीएमपीवरसुद्धा कारवाई होईलकायदा सर्वांना सारखा असतो. धोकादायक पद्धतीने पीएमपी रस्त्यावर लावण्यात आल्या असतील तर त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात येईल. शहरामध्ये नागरिकांनी धोकादायक पद्धतीने वाहने लावल्याचे आढळल्यास आणि महापालिका, वाहतूक शाखा यांच्याकडे तक्रार केल्यास करवाई करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त सातपुते यांनी सांगितले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीPuneपुणे