४९० लिटर गावठी दारू जप्त
By Admin | Updated: August 21, 2015 02:41 IST2015-08-21T02:41:56+5:302015-08-21T02:41:56+5:30
गावठी हातभट्टी दारू घेऊन जाणारी जीपगाडी भोर पोलिसांनी पाठलाग करून निगुडघर येथे पकडली. गाडीतील सुमारे ५८ हजार ८०० रु. किमतीचे

४९० लिटर गावठी दारू जप्त
भोर : गावठी हातभट्टी दारू घेऊन जाणारी जीपगाडी भोर पोलिसांनी पाठलाग करून निगुडघर येथे पकडली. गाडीतील सुमारे ५८ हजार ८०० रु. किमतीचे ४९० लिटरचे १४ कॅन दारू व गाडी जप्त केली आहे. दोन जणांना अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
गणेश अशोक जाधव (रा. वेताळ पेठ) व दिनेश मारुती सागळे (वय २४, रा. मंगळवार पेठ) यांना दारू घेऊन जाताना अटक केली आहे. पोलीस हवालदार रमेश साळुंके यांनी फिर्याद दिली आहे.
भोर-महाड रोडवरून गावठी दारू घेऊन गाडी जात असल्याची महिती खबऱ्यांमार्फत पोलिसांना मिळाली होती. पोलीस हवालदार एस. पी. जाधव, रमेश साळुंके, जमादार दिनेश गुंडगे, औदुंबर अडवाल, सुभाष गिरे, नाना जेधे, विश्वास जाधव, नोबा बुनगे, भाऊसाहेब गायकवाड यांनी या जीपचा पाठलाग करून निगुडघर येथे गाडी पकडली. (वार्ताहर)