शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

पिंपरी चिंचवड तहसीलमध्ये ४,८६२ दाखले प्रलंबित;‘सर्व्हर’च्या तांत्रिक अडचणीमुळे दाखले मिळण्यास विलंब

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 12:51 IST

- २० मेनंतर सर्व्हर सतत बंद होण्यास सुरुवात, दोन महिन्यांत ३३,२३२ दाखले वितरित, विद्यार्थी, पालकांवर चकरा मारण्याची वेळ

पिंपरी : नोकरी, विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश आणि परीक्षांसाठी उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, नॉन-क्रिमीलेअर यासारख्या कागदपत्रांची गरज भासते. मात्र, ‘सर्व्हर डाउन’च्या तांत्रिक अडचणीमुळे दाखले मिळण्यास विलंब होत आहे. परिणामी, पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयात तब्बल ४,८६२ दाखले प्रलंबित असून, विद्यार्थी आणि पालकांना तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहेत.

शासनाने दाखल्यांसाठी डिजिटल प्रणाली लागू केली असली, तरी कागदोपत्री कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरही सरकारी सर्व्हर वारंवार बंद पडत आहे. यामुळे दाखले मिळण्यास उशीर होत असून, विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांची गैरसोय होत आहे. तर १ एप्रिल ते ३१ मे २०२५ दरम्यान तहसील कार्यालयातून ३३,२३१ दाखले वितरित करण्यात आले आहेत.

साधारण २० मेनंतर सर्व्हर सतत बंद होण्यास सुरुवात झाली. मात्र, सोमवारपासून सर्व्हर काही प्रमाणात सुरळीत झाले असून रात्रीचे सर्व्हर चांगल्या पद्धतीने चालत असल्याचे तहसील प्रशासन सांगत आहे.

तहसीलमधील दाखल्यांची परिस्थिती

(१ एप्रिल २०२५ ते ३१ मे २०२५)

दाखला    - मंजूर - ना मंजूर - प्रलंबित

- उपन्न  - २३,७४३ - १९५  - २,२५५

- रहिवासी  - १,४४५ - ३  - १९०

- अधिवास (डोमिसाईल) - ५,७२६ - ९४  - १,६७०

- ज्येष्ठ नागरिक    - २२१ - ०   - २२

- जात प्रमाणपत्र  - ७६२ - २  - १४६

- महिला आरक्षण  - १४   - ०   - १

- आर्थिक दुर्बल घटक   - ४९१    - १०     - ९७

- नॉन-क्रिमीलेअर   - ८३० - १     - ४८१

....................

एकूण        - ३३,२३२ - ३०५ - ४,८६२

---------

या दाखल्यांसाठी किचकट प्रक्रिया

नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी खूप वेळ काढू प्रक्रिया असून त्यासाठी ओळखपत्र, १५ वर्षे पूर्वीचा रहिवासी पुरावा, जातीचे प्रमाणपत्र, तीन वर्षांचे तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, १९६९ पूर्वीचा वडील, चुलते, आत्या, आजोबा यांपैकी एकाचा शाळा सोडल्याचा दाखला तसेच लग्नापूर्वी आणि नंतरचे नाव बदलल्याचा पुरावा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. हे कागदपत्रे नसल्यास अगोदर हे कागदपत्रे मिळवायचे, त्यानंतर नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी अर्ज करावा लागतो.

दाखल्यासाठी शुल्क व कालावधी

सेवा प्रकार     - शुल्क (रु.) - कालावधी (दिवस)

सर्व साधारण प्रतिज्ञापत्र  - ६९  - १            

वय, अधिवास, राष्ट्रीय प्रमाणपत्र - ६९     - १५

उत्पन्न दाखला (३ वर्षे व १ वर्षे) - ६९ - १५

जातीचा दाखला  - १२८   - ४५

नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र  - १२८   - ४५

केंद्र सरकार जात प्रमाणपत्र - १२८     - ४५

आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र - ६९       - १५

स्थानिक वास्तव्याचा दाखला - ६९     - १५

रहिवासी दाखला       - ६९ - १५

महिला आरक्षण     - ६९ - ३०

ज्येष्ठ नागरिक दाखला      - ६९ - १५ 

सर्व्हरचे अपडेट सुरू असल्याने दाखले मिळण्यास विलंब होत असून सध्या प्रणाली रात्रीच्या वेळी सुरळीत चालते. त्यामुळे रात्रीचे काम केले जात आहे. पुढील आठवड्यात सर्व प्रलंबित दाखले वितरित होऊ शकतात.  - जयराज देशमुख, अपर तहसीलदार, पिंपरी चिंचवड

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्र