पुलांसाठी साडेचार कोटींचा निधी
By Admin | Updated: March 23, 2017 04:10 IST2017-03-23T04:10:26+5:302017-03-23T04:10:26+5:30
पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुलांची बांधणी करण्यासाठी २ कोटी ९७ लाख व रस्तेदुरुस्तीसाठी

पुलांसाठी साडेचार कोटींचा निधी
मंचर : पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत शिरूर लोकसभा मतदारसंघातील पुलांची बांधणी करण्यासाठी २ कोटी ९७ लाख व रस्तेदुरुस्तीसाठी १ कोटी ५४ लाख याप्रमाणे ४ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या टप्पा १० व ११ अंतर्गत आंबेगाव, खेड व जुन्नर तालुक्यांतील पुलांना निधी मंजूर करण्यात आला आहे.
यामध्ये प्रजिमा १० बी ते आंबेदरा, ता. आंबेगाव रु. ६७.१३ लक्ष, टाकळकरवाडी, ता. खेड रु. ६५.०१ लक्ष, कोरेगाव ते कळुस, ता. खेड रु. ९५.६३ लक्ष व मांडवे ते जांभुळशी, ता. जुन्नर रु. ६९.५५ लक्ष याप्रमाणे पूल बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या विशेष दुरुस्तीअंतर्गत आंबेगाव तालुक्यातील चिंचोली चास साकोरे रस्ता सुधारणा करणे रु. १८ लक्ष, प्रजिमा ६ ते ठाकरवाडी रस्ता सुधारणा करणे रु.९ लक्ष, खेड तालुक्यातील शेलू ते भांबोली रस्ता सुधारणा करणे १७ लक्ष, खेड ते बहिरवाडी रस्ता सुधारणा करणे रु. ४ लक्ष, जुन्नर तालुक्यातील मांडवे ते जांभुळशी रस्ता सुधारणा करणे १५ लक्ष, राष्ट्रीय महामार्ग २२२ ते कोल्हेवाडी रस्ता सुधारणा करणे रु. २० लक्ष, शिरूर तालुक्यातील आमदाबाद ते चानखनबाबावस्ती रस्ता सुधारणा करणे रु. १८ लक्ष, प्रजिमा ५३ ते पिंपळाचीवाडी रस्ता सुधारणा करणे रु. ४.५० लक्ष, रामा ६० टाकळीभीमा बाळोबाचीवाडी रस्ता सुधारणा करणे रु. ३ लक्ष व हवेली तालुक्यातील लोणीकंद ते झिरखेवसती रस्ता सुधारणा करणे रु. १८ लक्ष, प्रजिमा वाडेबोल्हाई ते शिंदेगायकवाडवस्ती रस्ता सुधारणा करणे रु. ४ लक्ष याप्रमाणे रस्त्यांची सुधारणा व अन्य काही रस्त्यांची किरकोळ दुरुस्ती करण्याकरिता निधी मंजूर करण्यात आला आहे.
पंतप्रधान ग्रामसडक योजना ही केंद्राची योजना असून, या योजनेअंतर्गत स्थानिक खासदारांमार्फत केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात येतात. (वार्ताहर)