कोरोना लशीसाठी ४३ हजार जणांची नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:11 IST2020-12-08T04:11:13+5:302020-12-08T04:11:13+5:30
पुणे : केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील सर्व सेवकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. याकरिता पुणे शहरातून ...

कोरोना लशीसाठी ४३ हजार जणांची नोंदणी
पुणे : केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील सर्व सेवकांना कोरोना लस देण्यात येणार आहे. याकरिता पुणे शहरातून ४३ हजार जणांनी नोंदणी केली आहे़
कोविड-१९ च्या लसीकरण मार्गदर्शन सूचनेनुसार प्रारंभी सरकारी, खाजगी, महापालिका रूग्णालये तसेच वैैद्यकीय महाविद्यालयातील व आयुष महाविद्यलायातील सर्वांना ही लस देण्यात येणार आहे़ यात सर्व डॉक्टर, नर्स व पॅरामेडिकल स्टाफ यांचा समावेश आहे़ पुणे महापालिकेने शहरातील सर्व रूग्णालयांमधील सेवकांना नोंदणी करण्याचे आवाहन केले होते़ यात आत्तापर्यंत ४३ हजार जणांनी नोंदणी केली आहे़
काही खाजगी रूग्णालयांनी अद्याप माहिती सादर केली नसल्याने, ९ डिसेंबरला सकाळी अकरापर्यंत ती आपआपल्या परिसरातील क्षेत्रिय वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे ती सादर करण्याचे आवाहन पुणे महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. अमित शहा यांनी केले आहे़
===============================