खडकवासला साखळी धरणात ४३ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 04:05 IST2017-07-18T04:05:38+5:302017-07-18T04:05:38+5:30
पुणे शहरात सोमवारी दिवसभर पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी येत होत्या़ सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १० मिमी पावसाची नोंद झाली होती़ गेल्या काही दिवसांपासून

खडकवासला साखळी धरणात ४३ टक्के पाणीसाठा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहरात सोमवारी दिवसभर पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी येत होत्या़ सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १० मिमी पावसाची नोंद झाली होती़ गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला साखळी धरणात सोमवारी सायंकाळपर्यंत ४३़७३ टक्के पाणीसाठा झाला होता़ जिल्ह्यातील धरणातही पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून कळमोडी १०० टक्के भरल्यानंतर सांडव्यातून ८६० क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे़
पानशेत धरणात ६़५६ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ६१़५५ टक्के भरले आहे़ वरसगाव ३५़़०७ टक्के, टेमघर २०़३० टक्के पाणीसाठा झाला असून दिवसभरात पानशेत येथे २२, वरसगाव २०, टेमघर २९, खडकवासला ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे़
मुळशी धरणात ५२़६० टक्के पाणीसाठा झाला असून आज दिवसभरात २० मिमी पाऊस पडला़ आतापर्यंत मुळशीत १४८१ मिमी पाऊस झाला असून, जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पवना १५९० मिमी आणि वडिवळे १५१६ मिमी पावसाची नोंद झाली आहे़ उजनी धरणात अजून उणे ७़९६ टक्के पाणीसाठा आहे़