जिल्ह्यात ४२०० सिंचन विहिरी

By Admin | Updated: September 3, 2015 03:10 IST2015-09-03T03:10:40+5:302015-09-03T03:10:40+5:30

ष्काळी परिस्थितीचा विचार करून जिल्हा परिषदेने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत घेण्यात येणाऱ्या विहिरींचे नियोजन केले

4200 irrigation wells in the district | जिल्ह्यात ४२०० सिंचन विहिरी

जिल्ह्यात ४२०० सिंचन विहिरी

पुणे : दुष्काळी परिस्थितीचा विचार करून जिल्हा परिषदेने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनांतर्गत घेण्यात येणाऱ्या विहिरींचे नियोजन केले असून, पुढील तीन वर्षांत ४ हजार २00 सिंचन विहिरी घेण्यात येणार आहेत.
२ आॅक्टोबरपासून या उपक्रमाचा शुभारंभ विभागातील खासदार, आमदार , जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले. शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय विकेंद्रित पाणीसाठ्याच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचे शासनाने ठरविले आहे.
त्यानुसार पुढील तीन वर्षांमध्ये (जून २०१५ ते जून २०१८) जिल्ह्यातील १३ तालुक्यांत ४२०० विहिरींचे किमान उद्दिष्ट विभागीय आयुक्त पुणे विभाग यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषद पातळीवरून तालुक्यांना निश्चित करून देण्यात आले आहे.
या विहिरींसाठी शेतकऱ्यांना ३ लाखांचे अनुदान त्याच्या होणाऱ्या कामाप्रमाणे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 4200 irrigation wells in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.