४१ कोटींचा टंचाई आराखडा मंजूर

By Admin | Updated: January 21, 2016 01:22 IST2016-01-21T01:22:01+5:302016-01-21T01:22:01+5:30

जिल्ह्यातील संभाव्य दृष्काळग्रस्त पूरस्थिती व निर्माण होणारी गंभीर पाणीटंचाई लक्षात घेता पुणे जिल्हा परिषदेने तयार केलेल्या सुमारे ४० कोटी ९१

41 crore clearance draft approved | ४१ कोटींचा टंचाई आराखडा मंजूर

४१ कोटींचा टंचाई आराखडा मंजूर

पुणे : जिल्ह्यातील संभाव्य दृष्काळग्रस्त पूरस्थिती व निर्माण होणारी गंभीर पाणीटंचाई लक्षात घेता पुणे जिल्हा परिषदेने तयार केलेल्या सुमारे ४० कोटी ९१ लाख रुपयांच्या टंचाई कृती आराखड्याला जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी मान्यता दिली आहे. गेल्या काही वर्षांत यंदा प्रथमच टंचाई आराखडा चार महिने अगोदरच म्हणजे जानेवारी महिन्यात मंजूर करण्यात आला आहे.
यामुळे प्रत्यक्ष पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वीच जिल्ह्यात टंचाईच्या कामांना सुरुवात होण्यास मदत होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी दिली.
कंद यांनी सांगितले, संभाव्य पाणीटंचाई विचारात घेऊन नवीन विंधन विहिरी घेणे, नळ-पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ -पाणीपुरवठा योजना सुरू करणे, टँकर, विहिरीचे अधिग्रहण करणे, आदी विविध कामे सुचविण्यात आली आहेत. आराखड्याला उशिरा मान्यता मिळाल्यावर निधी उपलब्ध होऊन प्रत्यक्ष काम करण्यासाठी खूपच उशीर होतो आणि पाऊस सुरू झाला, की टंचाईची कामे सुरू होतात हा आतापर्यंतचा अनुभव होता. त्यामुळे
या वेळी आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यातच ग्रामसभेची मागणी लक्षात घेऊन टंचाई कृती आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील तब्बल ४८८ हातपंपांची दुरुस्ती करण्यात येणार असून यासाठी ३४ लाखांच्या
निधीला बुधवारी पाणीपुरवठा व जलसंधारणच्या बैठकीत मंजुरी घेण्यात आली. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यास जिल्हा परिषदेने सुरुवात केली आहे.
संभाव्य पाणीटंचाईची झळ कमी करण्यासाठी हातपंप दुरुस्त करण्यात येणार आहेत.
यात गंजलेले पाइप, नळ््या
वाढविणे, कट्ट्यांची दुरुस्ती, पाइप बदलणे आदी देखभाल व दुरुस्ती जिल्हा परिषदेच्यामार्फत करण्यात येणार आहे.टंचाई कृती आराखड्यात प्रामुख्याने जिल्ह्यात २ हजार १५४ नवीन विंधन विहिरी घेण्यात येणार असून, त्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर १८५ नळ-पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सर्वाधिक १५ कोटी रुपयांची तरतूद टँकरसाठी करण्यात आली आहे.

Web Title: 41 crore clearance draft approved