शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

New Year 2024: नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे शहर परिसरात ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त

By नितीश गोवंडे | Updated: December 30, 2023 16:47 IST

शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे....

पुणे : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यासह काही संवेदनशील भागात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुणेपोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी ४ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शहरातील कॅम्प परिसर, फर्ग्युसन रस्ता परिसर, विविध मॉल्स, हॉटेल्स, लॉज, ढाबे, बस, रेल्वे स्थानक, मंदीर, चर्च व धार्मिक स्थळांची तपासणी करण्यात येत आहे. यावेळी संशयित व्यक्ती आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून योग्य ती खबरदारी पुणे पोलिसांकडून घेतली जात आहे. ३१ डिसेंबर व नुतन वर्षाच्या स्वागत बंदोबस्तादरम्यान कुठेही घातपाताची घटना घडणार नाही, चेंगरा-चेंगरी होणार नाही, विशेषत: महिलांची सुरक्षितता, चैन स्नॅचिंग, पाकीटमारी सारख्या घटना घडणार नाहीत ही बंदोबस्ताची उद्दिष्ट्ये निश्चित करण्यात आली आहेत.

यासह शहरातील विविध भागांमध्ये नाकाबंदी देखील करण्यात येणार असून, वाहतूक शाखेकडून ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राईव्ह, मॉडिफाय सायलेंसर व अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच शहरातील महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून तसेच श्वान पथकांकडून तपासणी देखील केली जणार आहे. शहरातील या भागांमध्ये जलद प्रतिसाद पथक (क्युआरटी) आणि दामिनी पथक देखील तैनात असणार आहे.

तसेच नागरिकांना होणतीही आक्षेपार्ह्य माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ ०२०-२६१२६२९६ / ८९७५२८३१०० / ८९७५९५३१०० (व्हॉट्सअप) अथवा ११२ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

असा असेल पोलिस बंदोबस्त..- अपर पोलिस आयुक्त - ०२- पोलिस उपायुक्त - ०५- सहायक पोलिस आयुक्त - १०- पोलिस निरीक्षक - ४०- सहायक पोलिस निरीक्षक / उपनिरीक्षक - १५०- पोलिस अंमलदार - २७००- छेडछाड विरोधी पथक - ३२- दामिनी पथक - १६

वाहतुक शाखेचा बंदोबस्त..- पोलिस उपायुक्त - ०१- सहायक पोलिस आयुक्त - ०३- पोलिस निरीक्षक - १४- सहायक पोलिस निरीक्षक / उपनिरीक्षक - ३३- पोलिस अंमलदार - ५७०- फिक्स पॉईंट - ३३- डी डी पथक - २३- पेट्रोलिंग मोबाइल - २७

टॅग्स :PoliceपोलिसPuneपुणे