शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

४०० रुपयांचा ड्रेस पडला एक लाखाला; ओटीपी शेअर न करताही ऑनलाइन फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 16:25 IST

ड्रेस पसंत न पडल्याने त्यांनी ड्रेस रिटर्न करण्याची रिक्वेस्ट पाठविली होती.

ठळक मुद्देयाप्रकरणी विश्रांतवाडी येथील एका २२ वर्षाच्या तरुणीने दिली फिर्याद

पुणे : शॉपिंग मॉल या वेबसाइटवर ४०० रुपयांचा ड्रेस मागविला. परंतु, ड्रेस पसंत न पडल्याने तो परत करताना त्यांना आलेला मेसेज या तरुणीने फॉरवर्ड केला. मात्र, संबंधिताने ओटीपी मागितला असता या तरुणीने तो शेअर केला नाही. तरीही त्यांच्या बँक खात्यातून १ लाख ५ हजार रुपये ऑनलाईन काढून घेऊन फसवणुक केली.याप्रकरणी विश्रांतवाडी येथील एका २२ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे. त्या मेट्रो पुणे येथे कामाला आहेत. त्यांनी शॉपिंग मॉल या वेबसाईटवर १३ ऑक्टोबर २०१९ रोजी ड्रेस पाहिला होता. त्यांनी तो ऑनलाईन खरेदी केला. त्यांना तो कुरिअरने मिळाला. मात्र, तो ड्रेस पसंत न पडल्याने त्यांनी ड्रेस रिटर्न करण्याची रिक्वेस्ट पाठविली होती. त्यानुसार १७ ऑक्टोबरला एक कर्मचारी त्यांच्या घरी आला. परंतु, त्या घरी नव्हत्या. त्यानंतर १८ ऑक्टोबरला त्यांना एक फोन आला व त्याने ड्रेस रिटर्न  करायचा आहे का, अशी चौकशी केली. ड्रेस कोड विचारला. त्यानंतर त्याने तुम्हाला एक मेसेज येईल तो या नंबरवर फॉरवर्ड करा. त्यानुसार त्यांनी आलेला मेसेज फॉरवर्ड केला. त्यानंतर त्याने पुन्हा फोन करुन मोबाईलवर आलेला ओटीपी देण्यास सांगितले. परंतु, त्यांनी तो दिला नाही. त्यानंतर त्यांनी रात्री बँक खाते तपासले तर त्यांच्या खात्यातून १ लाख ५ हजार रुपये ऑनलाईन काढण्यात आल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांना त्या नंबरवरुन वारंवार फोन आला व एटीएम डिटेल्स द्या ८० टक्के पैसे परत करतो, असे सांगितले. मात्र, त्यांनी काहीही माहिती न देता, तो नंबर ब्लॉक केला. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. सायबर पोलिसांनी अधिक तपासासाठी हा गुन्हा विश्रांतवाडी पोलिसांकडे वर्ग केला आहे.

टॅग्स :Vishrantwadiविश्रांतवाडीfraudधोकेबाजीWomenमहिलाonlineऑनलाइनPoliceपोलिस