पुण्यातील सेवा सदन शाळेतील ४० विद्यार्थिंनींना अन्नातून विषबाधा

By Admin | Updated: December 20, 2015 11:53 IST2015-12-20T10:51:45+5:302015-12-20T11:53:59+5:30

अन्नातून विषबाधा झाल्यामुळे पुण्यातील सेवा सदन शाळेतील विद्यार्थिंनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

40 students of Pune Sadan Sadan School get food poisoning | पुण्यातील सेवा सदन शाळेतील ४० विद्यार्थिंनींना अन्नातून विषबाधा

पुण्यातील सेवा सदन शाळेतील ४० विद्यार्थिंनींना अन्नातून विषबाधा

ऑनलाइन लोकमत 

पुणे, दि. २० - अन्नातून विषबाधा झाल्यामुळे पुण्यातील सेवा सदन शाळेतील विद्यार्थिंनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकूण ४० विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाली आहे.  सकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक काही मुलींना पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यामुळे काही मुलींना गोरे तर, काहींना मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

डॉक्टरांनी अद्याप अधिकृत माहिती दिली नसली तरी, अन्नातून विषबाधा झाल्यामुळे हा त्रास झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही रुग्णालयात दाखल असलेल्या विद्यार्थिंनींची प्रकृती आता स्थिर आहे.  पुण्याच्या लक्ष्मी रोडवर ही सेवा सदन शाळा असून, या सर्व विद्यार्थिंनी १६ ते १८ वयोगटातील असून पाचवी ते अकरावी इयत्तांमध्ये शिकणा-या आहेत. 

Web Title: 40 students of Pune Sadan Sadan School get food poisoning