शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

'गोविंदबागे'तील कोरोना पॉझिटिव्ह ४ शेती कामगारांच्या संपर्कातले ४० जण क्वारंटाईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 17:33 IST

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग निवासस्थानी शेती काम करणाऱ्या चार जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

ठळक मुद्देबारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु

बारामती: ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी कोरोनाने प्रवेश केला आहे. शुक्रवारी (दि.२१) येथील चार शेती कामगारांना कोरोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.त्यानंतर या कामगारांच्या संपर्कातील ४० जणांचे स्वॅब घेण्यात आले असुन सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.या सर्वांवर बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी याबाबत माहिती दिली.त्यानुसार या चौघांची प्रकृती स्थिर आहे.त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत.चौघाजणांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. चौघांच्या प्रत्येकी दहाजणांचे स्वॅब घेण्यात आल्याचे डॉ.खोमणे यांनी सांगितले.दरम्यान,आज शहर आणि तालुक्यात  तपासणीसाठी घेतलेल्या १३८ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये एकूण ११८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.बारामती शहरातील ९ व ग्रामीण भागातील ८ असे सतरा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तसेच इंदापूर तालुक्यातील तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.शहरातील पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये आमराई येथील एक, तांदूळवाडी येथील एक, सूर्यनगरी येथील दोन, कसबा येथील एक, बारामती शहरातील २ , भिगवण रस्ता येथील एक व उपजिल्हा रुग्णालयातील एक शासकीय वैद्यकीय अधिकारी असे नऊ जणांचा समावेश आहे .तसेच पंधरे येथील पॉझिटिव रुग्णाच्या संपकार्तील एकाच कुटुंबातील सहा जण व काटेवाडी येथील २ असे ग्रामीण भागातील आठ असे एकूण १७  रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच बारामतीतील खाजगी प्रयोगशाळेमध्ये  काल एकूण ४५  नमुने एंटीजेन तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी शहरातील ८ व ग्रामीण भागातील ५ असे १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत एंटीजेन पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये शहरातील देसाई इस्टेट मधील एक, अशोक नगर मधील एक, सिद्धार्थ नगर हौसिंग सोसायटीमधील एक, अंबिका नगर मधील एक ,हरिकृपा नगर मधील एक, नक्षत्र गार्डन येथे एक, संगवीनगर येथील एक व तांदुळवाडी येथे एक असे आठ रुग्ण व करंजेपुल येथील  एक माळेगाव येथील दोन, कोºहाळे बुद्रुक येथील एक व कांबळेश्वर येथील एक असे पाच व एकूण १३ एंटीजेन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत.. त्यामुळे काल दिवसभरात एकूण ३० रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. बारामतीची रुग्ण संख्या ५०३ वर गेली आहे,अशी माहिती डॉ खोमणे यांनी दिली.——————————

टॅग्स :Baramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसhospitalहॉस्पिटल