इंटरनेटवरून 40 लाखांची फसवणूक
By Admin | Updated: November 8, 2014 23:56 IST2014-11-08T23:56:38+5:302014-11-08T23:56:38+5:30
होगनास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सीईओला ईमेल आयडीद्वारे वेळोवेळी रक्कम दिल्लीच्या एका खात्यावर ट्रान्स्फर करण्यास भाग पाडून 39 लाख 56 हजारांची फसवणुकीचा प्रकार घडला.

इंटरनेटवरून 40 लाखांची फसवणूक
पुणो : होगनास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सीईओला ईमेल आयडीद्वारे वेळोवेळी रक्कम दिल्लीच्या एका खात्यावर ट्रान्स्फर करण्यास भाग पाडून 39 लाख 56 हजारांची फसवणुकीचा प्रकार घडला. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी उत्तर प्रदेश येथील एकाला अटक केली. न्यायालयाने त्याला 13 नोव्हेंबर्पयत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
सोमपाल ऊर्फ पवनकुमार कालिचरण (वय 4क्, रा. व्हिलेज उंडलाजागीर, जि. बरेली, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कासीम अली नक्षअली (उंडलाजागीर, उत्तर प्रदेश), अरविंद सिंग (रा. नवी दिल्ली), एस. के. एन्टरप्रायङोस (नवी दिल्ली) यांचा पोलीस तपास करीत आहेत. राजेंद्रकुमार सारंगी (वय 44, रा. लाईफ पार्क सोसायटी, मोहम्मदवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे कोरेगाव पार्क येथील होगनास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत चीफ फायनान्स ऑफिसर व कंपनीचे सचिव म्हणून नोकरी करीत आहेत. फिर्यादी सारंगी यांना 5 मे ते 8 मे रोजी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांच्या मेल आयडीवरून आरोपींनी ई मेल पाठविले व सारंगी यांना अरविंद सिंग या नावाच्या व्यक्तीच्या पंजाब नॅशनल बँक नवी दिल्ली येथील खात्यावर ट्रान्स्फर करण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी तब्बल 39 लाख 56 हजार रुपयांची ट्रान्सफर करून कंपनीची व फिर्यादीची फसवणूक केली. कालिचरण व नक्षअली या दोघांनी संगनमत करून एस. के. एन्टरप्रायङोस नावाची फर्म तयार करून त्या नावे बँकेत खाते उघडले. या खात्यावर त्यांनी जनतेचे ई-मेल आयडीची माहिती काढून त्यांना खोटे ई-मेल करून व्यवहाराची खोटी माहिती देऊन व्यवहाराचे पैसे स्वत:च्या खात्यावर जमा करून घेत. अशा प्रकारे त्यांनी फिर्यादी व इतरांचीही फसवणूक केली आहे. कालिचरण याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. कालिचरणच्या मदतीने इतर आरोपींचा शोध घ्यायचा आहे. यासाठी पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील सुचित्र नरोटे यांनी केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरली. (प्रतिनिधी)