पिंपरीतून ४० उमेदवारांचे अर्ज

By Admin | Updated: September 29, 2014 05:52 IST2014-09-29T05:52:00+5:302014-09-29T05:52:00+5:30

विधानसभा मतदार संघात एकुण ४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

40 candidates nominations from Pimpri | पिंपरीतून ४० उमेदवारांचे अर्ज

पिंपरीतून ४० उमेदवारांचे अर्ज

पिंपरी : विधानसभा मतदार संघात एकुण ४० उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. शनिवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
प्राधिकरणातील डॉ.हेडगेवार भवन येथे पिपिरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक कार्यालयात दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे काम सुरू होते.
राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत आमदार अण्णा बनसोडे,शिवसेनेच्यावतीने गौतम चाबुकस्वार,काँग्रेसतर्फे मनोज कांबळे, आरपीआय (आठवले गट) तर्फे चंद्रकांता सोनकांबळे, बहुजन समाज पक्षातर्फे क्षितीज गायकवाड,मनसेतर्फे अनिता सोनवणे,प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे अ‍ॅड सुनील माने,बहुजन मित्र सेना नागनाथ दाखले, जनता दलातर्फे डॉ. भास्कर बच्छाव,नॅशनॅलिस्ट रिपब्लिकन पार्टीतर्फे शांताराम खुडे,राष्ट्रीय बाल्मिकी सेना पार्टीतर्फे सुनीता छाजछिडक या उमेदवारांनी त्यांच्या पक्षातर्फे अधिकृत उमेदवार म्हणुन अर्ज दाखल केले आहेत.
भाजपतर्फे इच्छुक असलेल्या अमर साबळे, राजेश पिल्ले यांनी एक अर्ज पक्षातर्फे तर एक अपक्ष असे दोन अर्ज भरले आहेत. अमित गोरखे यांनी भाजपकडून अर्ज दाखल केला आहे. यापैकी कोणीही पक्षाचा एबी फॉर्म जोडलेला नाही. चंद्रकांत अंबादास माने यांनी काँग्रेसकडून व अपक्ष, प्रतिक झुंबरे यांनी शिवसेना, काँग्रेस आणि अपक्ष असे तीन अर्ज दाखल केले आहेत. गणेश बाळू शिर्के यांनी आरपीआयकडून अर्ज दाखल केला आहे.शैलेंद्र विधाते यांनी काँग्रेस व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. मनसेकडून मिलिंद केरबा सोनवणे यांनी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून संदीपान झोंबाडे यांनी अर्ज सादर केला आहे. यांनी कोणीही पक्षांचे एबी फॉर्म जोडलेले नाहित. दशरथ कसबे, राकेश गायकवाड, दत्तात्रय कुचेकर, सुरेंद्र गवळी, शाम घोडके, आशा रणदिवे, शोभा आदियाल, हर्षवर्धन मेश्राम यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: 40 candidates nominations from Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.