जुन्नर विधानसभा १९ उमेदवारांचे ४० अर्ज
By Admin | Updated: September 29, 2014 05:46 IST2014-09-29T05:46:01+5:302014-09-29T05:46:01+5:30
न्नर विधानसभा मतदारसंघासाठी एकोणीस उमेदवारांनी एकूण ४० अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप कडूसकर यांनी दिली.

जुन्नर विधानसभा १९ उमेदवारांचे ४० अर्ज
आपटाळे : जुन्नर विधानसभा मतदारसंघासाठी एकोणीस उमेदवारांनी एकूण ४० अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप कडूसकर यांनी दिली.
जुन्नर विधानसभा मतदारसंघाकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अतुल वल्लभ बेनके, मनसेचे शरद भिमाजी सोनवणे, शिवसेनेच्या आशाताई बुचके, भाजपाचे नेताजी डोके, काँग्रेसचे गणपतराव फुलवडे, हिंदुस्थान प्रज्ञा पक्षाच्या शोभा भद्रिगे बसपाचे अॅड. गफूर पठाण यांचे अर्ज दाखल झालेले आहेत.
अपक्ष म्हणून मनोज छाजेड, कविता छाजेड, पांडुरंग चिमटे, मारुती वायाळ, संभाजी तांबे, संतोष वाघ, राजेंद्र आल्हाट व सुखदेव खरात यांनी अर्ज दाखल केलेले आहेत. आज शेवटच्या दिवशी सेनेच्या आशाताई बुचके, भाजपाचे नेताजी डोके यांनी शक्तिप्रदर्शन करून अर्ज दाखल केले.
राष्ट्रवादीचे संजय शिवाजीराव काळे, काँग्रेसचे देवराम लांडे, तुषार शिवाजी थोरात यांनी पक्षाचे अधिकृत ए, बी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे
सादर न केल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध
होणार आहेत. (वार्ताहर)