४ टन डाळिंबाची चोरी

By Admin | Updated: October 15, 2015 00:55 IST2015-10-15T00:55:23+5:302015-10-15T00:55:23+5:30

येथील शेतकरी संतोष मधुकर पाटील यांच्या शेतातील उभ्या डाळिंंबाच्या झाडावरील सुमारे चार टन डाळिंंबे चोरून नेण्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला.

4 tons of pomegranate stolen | ४ टन डाळिंबाची चोरी

४ टन डाळिंबाची चोरी

बावडा : येथील शेतकरी संतोष मधुकर पाटील यांच्या शेतातील उभ्या डाळिंंबाच्या झाडावरील सुमारे चार टन डाळिंंबे चोरून नेण्याचा प्रकार मंगळवारी रात्री घडला.
याबाबत पाटील यांनी बावडा पोलिसात तक्रार दिली असून या घटनेचा अद्याप तपास लागलेला नाही. या भागात छोट्या मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून सद्या डाळिंब पिकाला सर्वत्र चांगला दर मिळत असल्याने चोरटयांनी आपला मोर्चा आता डाळिंबावर केंद्रित केला आहे. या परिसरात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण होवूनही शेतकऱ्यांनी डाळिंब पिकाची मोठ्या कष्टाने राखण केली आहे. मात्र, आता अशी पिके ही चोरीस जावू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती व काळजी पसरली आहे. (वार्ताहर)

Web Title: 4 tons of pomegranate stolen