पृथ्वीराज चव्हाण यांच्या आज शहरात ४ सभा
By Admin | Updated: February 15, 2017 02:22 IST2017-02-15T02:22:24+5:302017-02-15T02:22:24+5:30
विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा सुरू असतानाच आता काँग्रेस नेत्यांच्या सभा सुरू झाल्या असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण यांच्या आज शहरात ४ सभा
पुणे : विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या सभा सुरू असतानाच आता काँग्रेस नेत्यांच्या सभा सुरू झाल्या असून, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या बुधवारी शहरात ४ जाहीर सभा होणार आहेत. चव्हाण यांची पहिली सभा सायंकाळी साडेसहा वाजता मंगळवार पेठेतील सदानंदनगर येथे, दुसरी सभा येरवड्यातील चित्रा चौकात साडे सात वाजता तर तिसरी सभा पर्वती येथील लक्ष्मीनगरला रात्री ८.१५ वाजता, वानवडीत चौथी सभा रात्री ९ वाजता होईल़ याशिवाय ते दुपारी १२ वाजता विमाननगर-सोमनाथनगर रोड प्रभाग क्रमांक ३ मधील रोडशोमध्ये सहभागी होणार आहेत़
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आला होता़ माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या शनिवारी (दि. १८) सभा होत असून, ही सभा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संयुक्त सभा असणार आहे़
या सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही भाषण होणार आहे़ विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, नसीम खान, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडे यांच्याही पुण्यात सभांचे आयोजन करण्यात येत आहे़ याशिवाय ज्योतिरादित्य शिंदे यांची पुण्यात सभा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे़
(प्रतिनिधी)