नारायणगाव उत्पादन शुल्क कार्यालयातील ४ कर्मचारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:10 IST2021-08-01T04:10:20+5:302021-08-01T04:10:20+5:30

नारायणगाव दारू उत्पादन शुल्क कार्यालयातील निरीक्षक जी. डी. कुचेकर , नारायणगाव बिट क्र १ चे दुय्यम निरीक्षक ए. ई. ...

4 employees of Narayangaon excise office suspended | नारायणगाव उत्पादन शुल्क कार्यालयातील ४ कर्मचारी निलंबित

नारायणगाव उत्पादन शुल्क कार्यालयातील ४ कर्मचारी निलंबित

नारायणगाव दारू उत्पादन शुल्क कार्यालयातील निरीक्षक जी. डी. कुचेकर , नारायणगाव बिट क्र १ चे दुय्यम निरीक्षक ए. ई. तातळे, जवान विजय घुंदरे, दिलीप केकरे याना निलंबित करण्यात आले आहे .

राज्य उत्पादन शुल्कच्या मुंबई भरारी पथकाने दि. २५ जुलै रोजी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील ४ परमिट रुम व एका देशी दारूच्या दुकानावर छापा टाकून विना वाहतूक पास असलेला विविध कंपन्यांचा देशी व विदेशी दारू आढळून आल्याने भरारी पथकाने वरिष्ठ कार्यालयात कारवाईचा अहवाल सादर केला. या अहवालानुसार नारायणगाव दारू उत्पादन शुल्क कार्यालयातील निरीक्षक कुचेकर, दुय्यम निरीक्षक तातळे, जवान विजय घुंदरे, दिलीप केकरे यांनी वरिष्ठाच्या आदेशाचे पालन न करता व कोणतीही कारवाई न केल्याने कर्तव्याशी कसूर व शासनाची प्रतिमा मालिन केल्याचे सिद्ध झाल्याने या ४ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे .

Web Title: 4 employees of Narayangaon excise office suspended